PCOS Disease : मासिक पाळी वेळेवर येत नाही? पीसीओएसचा त्रास सतावतो? डाएटमध्ये सामील करा हे पदार्थ

PCOS Symptoms : बदलेल्या जीवनशैलीनुसार सध्या मासिक पाळी वेळेवर न येणे ही समस्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
PCOS Diet
PCOS DietSaam Tv
Published On

Irregular Periods :

महिलांना मासिक पाळी येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु बदलेल्या जीवनशैलीनुसार सध्या मासिक पाळी वेळेवर न येणे ही समस्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

सध्या पीसीओएसच्या त्रासाला १८ ते २० वयोगटातील मुली या आजाराला बळी पडत आहे. पीसीओएसचा आजार स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलनामुळे होतो. या आजारामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. यामुळे अंडाशयात सिस्ट तयार होऊ लागतात. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे येऊ लागतात. अचानक वजनही वाढू लागते. महिलांमध्ये पुरुष संप्रेरक वाढल्याने असे घडते असे म्हटले जाते. वेळीच उपचार न घेतल्यास ओटीपोटीचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.

PCOS Diet
Irregular Periods : मासिक पाळी वेळेवर येत नाही? स्वयंपाकघरातील 'या' पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा

नुकत्याच झालेल्या संशोधनामुळे पीसीओएस बाबतीत समोर आले आहे की, पुरेपुर आहार घेतल्यानंतर पीसीओएसची लक्षणे नियंत्रित केली जाऊ शकतात. ज्यामुळे या रोगांवर नियंत्रण ठेवता येईल. मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की 45 दिवस केटो आहाराचे पालन केल्याने महिलांच्या शरीरातील हार्मोनल असंतुलनाची समस्या नियंत्रणात येते. त्यामुळे PCOS आजार होण्याची शक्यता कमी असते. केटो डाएटमध्ये कमी कार्बोहायड्रेट, जास्त फॅटयुक्त आहार घेतला जातो.

जर्नल ऑफ एंडोक्राइनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की केटो आहाराचे पालन केल्याने महिलांची प्रजनन क्षमता देखील सुधारली आहे. यासोबतच हार्मोनल डिस्टर्बन्सही नियंत्रणात येतात. यामुळे PCOS चा धोका कमी होतो.

PCOS Diet
Smart and Intelligent Women : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?

1. 170 महिलांचा समावेश आहे

या संशोधनात 170 महिलांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना किटो आहार देण्यात आला. यामध्ये त्यांना कमी कर्बोदके असणारे अन्नपदार्थ देण्यात आले. हा आहार घेणाऱ्या महिलांमध्ये वेळेवर मासिक पाळी (Irregular Periods) न येण्याची समस्या कमी झाली. शिवाय वाढत्या वजनावर देखील नियंत्रण ठेवता आहे.

केटोजेनिक आहार आणि पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये प्रजनन संप्रेरक पातळीत सुधारणा यांच्यात एक संबंध आढळला आहे. किटो आहारामुळे पीसीओएसवर सहज मात करता येते. या आहारामुळे वजन नियंत्रणात (Weight Control) राहते. केटो आहारामुळे शरीरातील चयापचय क्रियाही व्यवस्थित राहते. हार्मोन्स देखील संतुलित राहतात.

PCOS Diet
Parenting Tips : पालकांनो, मुलांसमोर चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा...

2. हे पदार्थ किटो आहारात असतात

  • मांस- मासे

  • चीज

  • सुका मेवा

  • हिरव्या भाज्या

  • फळे

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com