Parenting Tips : पालकांनो, मुलांसमोर चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा...

कोमल दामुद्रे

मुलांच्या मनावर होतो परिणाम

आई-वडील मुलांसमोर ज्या काही गप्पा-गोष्टी करतात, त्या मुलांच्या मनात कायम घर करून राहतात. त्यामुळं मुलांसमोर काय बोलू नये किंवा कोणत्या गप्पा मारू नयेत हे जाणून घेऊयात.

निंदा करू नये

मुलांसमोर कधीच एकमेकांबद्दल वाईट बोलू नये. असं केल्यास त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो.

Parenting Tips | Saam Tv

पैशांबद्दल चर्चा करू नये

पैशांची चणचण किंवा काही अडचणी असल्यास त्याबाबत मुलांसमोर चर्चा करू नये. या गोष्टींमुळं त्यांचं मन खट्टू होतं.

आजार किंवा शारीरिक समस्या

एखाद्या आजारानं त्रस्त आहात, तर त्याबाबत मुलांसमोर काहीही बोलू नका. कारण अशा गोष्टी कानावर आल्यानं मुलांना नैराश्य येण्याची भीती असते.

तुलना करू नका

आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. त्यामुळं मुलांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते.

चुकीची भाषा वापरू नका

मुलांसमोर चुकीची भाषा किंवा आक्षेपार्ह शब्दांचा वापर करू नये. मुलं इतरांशी बोलताना अशीच भाषा वापरू शकतात.

वाद घालू नका

एखाद्या मुद्द्यावर मुलांसमोरच वाद घालू नये. एखादा चुकीचा किंवा आक्षेपार्ह शब्द वापरलात तर, त्याचा थेट परिणाम मुलांवर होतो.

खोटं बोलू नका

मुलांसमोर कधीही खोटं बोलू नये. असं केल्यास मुलांनाही या वाईट सवयी लागू शकतात.

Next : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?