कोमल दामुद्रे
यंदा गणेशोत्सवाचा सण हा १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
देशभरात हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो.
मानाचे, मंडळाचे आणि मोठं मोठ्या गणपतीच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.
परंतु मुंबापुरीतली सर्वात उंच गणेशमूर्ती पाहिलीत का?
गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात दक्षिण मुंबईत अनेक गणरायाचं आगमन थाटामाटत झालेलं आहे.
यंदा देखील दक्षिण मुंबईतील ११ वी गल्ली खेतवाडीत ४५ फूट उंच गणेशमूर्तीचे आगमन झाले आहे.
खेतवाडी चा लंबोदरा' या नावाने ओळखल्या जाणार्या 'मुंबईचा महाराजा'ची 45 फूट उंच मूर्ती इंद्रदेव अवतारात पाहायला मिळाली.
मागच्या वर्षी मुंबईच्या महाराजाची मूर्ती ही ३८ फूटाची होती. दरवर्षी भक्तगणांना गणपतीचे नवे रुप पाहायला मिळते.
१० दिवसांत लाखो भक्त गणरायाचे दर्शन घेण्यास मुंबईत येतात.