Friends New Year Party : मित्रमैत्रिणींसोबत कमी खर्चात न्यू इयर पार्टी करायचीये? मग ही ठिकाणं नक्की पाहा

Low-cost New Year celebration ideas : नव्या वर्षाच्या सुरूवातीला सगळेच लोक फिरण्याचा प्लान करत असतात. येणाऱ्या वर्षाचे स्वागत करायला फॅमिली, फ्रेंड्स एकत्र येतात आणि धमाल करत असतात.
Cheap And Cheerful NYE
Budget New Year PartyAI Generated
Published On

नव्या वर्षाच्या सुरूवातीला सगळेच लोक फिरण्याचा प्लान करत असतात. येणाऱ्या वर्षाचे स्वागत करायला फॅमिली, फ्रेंड्स एकत्र येतात आणि धमाल करत असतात. त्यासाठी खूप लांब लांब ठिकाणी जाण्याचे प्लान होत असतात. काही जण जवळपासच्या ठिकाणांना भेट देत असतात. मात्र फिरण्याच्या किंवा न्यू इयर पार्टीच्या नादात सर्वांच्या खिशाला जरा कात्रीच लागते.

३१ डिसेंबरला सर्वजण एकत्र येऊन न्यू इयर सेलिब्रेट करतात. त्यासाठी काहीजण समुद्राच्या ठिकाणी जातात, काहीजण हॉटेल्समध्ये जातात. अशा विविध ठिकाणी जाण्याचा ते प्लान करतात. मात्र त्यात मित्रमैत्रिणींची सोबत असेल आणि फिरण्यासाठी बजेट नसेल तर तुम्ही अशा काही ठिकाणी फिरू शकता जिथे तुम्हाला फिरण्यासाठी किंवा मौज मज्जा करण्यासाठी पैशांची गरज भासणार नाही.

Cheap And Cheerful NYE
Baby Health Tips : हिवाळ्यात लहान मुलांना डायपर घालताना या गोष्टींची काळजी घ्या; न्यूमोनियाचा धोका टाळा

मित्रमैत्रिणींसोबत फिरण्यासाठी काही उत्तम ठिकाणे

प्रसिद्ध मंदिरं

मुंबईत शिवाय संपुर्ण भारतात अशी काही मंदिरं आहेत की जिथे तुम्ही हवा तितका वेळ फिरू शकता. भारतात अनेक लोक नवीन वर्षाची सुरूवात देवी देवतांच्या दर्शनाने करत असतात. तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत तुमच्या जवळच्या प्रसिद्ध मंदिरात जावू शकता. त्यात महालक्ष्मी मंदिर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, हाजी अली दर्गा, टेम्पल, गणेश मंदीर, माटुंगा हनुमान मंदिर, गगनगीरी मठ अशा अनेक ठिकाणी जावू शकता.

स्थानिक पार्क आणि गार्डन

तुमच्या शहराजवळ असलेल्या मोठ्या पार्कमध्ये किंवा गार्डनमध्ये तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवू शकता. तुम्ही न्यू इयरला सकाळी थंड आणि फ्रेश वातावरणात फिरायला जाण्याचा प्लान करू शकता. तुम्ही विविध पार्कमध्ये पिकनिक प्लॅन करू शकता. त्यासाठी तुम्हाला अधिक खर्च करावा लागणार नाही.

जर तुम्ही मुंबईजवळ राहत असाल तर तुम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डोंबिवली सिव्हिक गार्डन, नेहरू उद्यान, कुलाबा गार्डन, मरीन ड्राईव्ह गार्डन, एलीफंटा गार्डन या मुंबईजवळच्या पार्कमध्ये तुम्ही फिरायला जावू शकता. तुम्ही विविध पार्कमध्ये पिकनिक प्लॅन करू शकता. त्यासाठी तुम्हाला अधिक खर्च करावा लागणार नाही.

Written By : Sakshi Jadhav

Cheap And Cheerful NYE
Healthy Snacks For Children : मुलांना ड्रायफ्रुट्स खायला देण्याचा सर्वात सोपा उपाय, काही दिवसातच वाढेल वजन

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com