
थंडीच्या दिवसात बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांमध्ये आजाराचं प्रमाण वाढतं. त्यामध्ये न्यूमोनियाचे प्रमाण जास्त असते. जर तुमच्या मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे दिसू लागली की तुम्ही जास्त प्रमाणात सावध व्हायला हवं. तुम्ही लहान मुलांना गरम कपड्यांमध्ये २४ तास ठेवले पाहिजे आणि त्यांना थंड हवेत जाण्यापासून थांबवलं पाहिजे.
हिवाळ्याच्या थंड वातावरणात मुलांचे थंडीपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण थंडी हे न्यूमोनियाचे मुख्य कारण आहे. लहान मुलांना नेहमी उबदार कपड्याने झाकून ठेवा. त्यांने मुलांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून गरम उबदार कपडे वापरावे. मात्र हिवाळ्यात छोट्या छोट्या चुका मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
पालक आपल्या मुलांना ओले होऊ नये म्हणून अनेकदा डायपर घालायला लावतात, परंतु याच्याशी संबंधित एक चूक त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया थंडीत डायपर घालताना कोणत्या चुका करू नयेत.
दर दोन तासांनी तासाने डायपर बदला
थंड हवामानात, दर दोन तासांनी मुलांचे डायपर तपासणे महत्त्वाचे आहे. डायपर ओला असेल तर लगेच बदला. मुलांचे शरीर जास्त पाण्याने पुसू नका, तर कपड्याने हलकेच पुसून टाका. जर समस्या वाढली किंवा मुलांना अस्वस्थ वाटत असेल, मुलं सारखी रडत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून कोणतीही गंभीर समस्या टाळता येईल.
लहान मुलांच्या त्वचेची काळजी घ्या
तुम्ही जेव्हा जेव्हा लहान बाळाचे डायपर बदलता तेव्हा त्याला हलक्या कोमट पाण्याने पुसून घ्या. तसेच त्वचा संपुर्ण कोरडी होईपर्यंत त्याला दुसरे डायपर वापरायला देऊ नका.
काही वेळ मुलांना डायपर घालू नका
दिवसातून मुलांना किमान एक ते दोन तास डायपर वापरू नका. त्याने मुलांच्या त्वचेला रॅशेस होणार नाही. तसेच मुलांना थोडे मोकळे वाटेल आणि त्यांची चिडचिड कमी होईल. तसेच त्यांना जर सर्दी, खोकला कफ अशा समस्या जाणवायला लागल्या तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Written By : Sakshi Jadhav