Parenting Tips: उन्हाचा तडाखा वाढतोय; अशी 'घ्या' लहान बाळांची काळजी

How To Take Care Babies: उन्हाचा तडाखा वाढत आहे. उन्हामुळे लहान बाळ आजारी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लहान बाळांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
How To Take Care Babies
How To Take Care BabiesYandex

Baby Care In Summer

मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच उन्हाने कहर केला आहे. उष्णतेमुळे मोठ्यांसोबत लहान बाळांनाही उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे आपल्या बाळांची कडक उन्हाळ्यात काळजी घेणं गरजेचं (How To Take Care Babies) आहे. नवजात बाळ असेल तर उष्णतेपासून त्यांची फार काळजी घ्यावी लागते.बाळाला उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे, ते आपण जाणून घेऊ या. (Latest Marathi News)

लहान बाळ अतिशय नाजूक असते. त्यामुळे उन्हाळ्यात कडक ऊन आणि नाजूक त्वचेवर उन्हाचा परिणाम होतो. त्यासाठी आपण काही विशेष टिप्स जाणून घेऊ या. उन्हाळ्यात दुपारी उष्णता जास्त (Parenting Tips) असते. त्या वेळी बाळाला घराबाहेर नेऊ नका.लहान बाळांच्या शरीरात मेलेनिन फार कमी प्रमाणात असते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम त्यांच्या त्वचेवर, केसांवर आणि डोळ्यांवर होतो.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाळांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी त्यांना भरपूर पाणी पाजा. पाण्यामुळे बाळाच्या शरीरातील उष्णता कमी होते. त्यामुळे बाळाचं शरीर थंड आणि हायड्रेट राहण्यास मदत (Baby Care In Summer) होते. जर बाळ सहा महिन्यांपेक्षा कमी वयाचं असेल, तर त्याला निरोगी ठेवण्यासाठी वेळोवेळी स्तनपान करत राहा.

बाळाला उन्हाळ्यात फॅब्रिक कपडे घालणे टाळा. त्यामुळे बाळाच्या त्वचेवर पुरळ उठण्याचा धोका असतो. त्यामुळे उन्हाळ्यात लहान बाळाला सुती कपडे घालावेत. त्यामुळे बाळांना खूप आराम (Baby Care) वाटतो. त्यामुळे बाहेर जाताना उन्हापासून बचाव करण्यासाठी बाळाचं डोकं सुती कपड्याने झाका. उन्हाळ्यात शक्यतो बाळाला सुती कपडेच घाला.

How To Take Care Babies
Parenting Tips : पालकांनो, या कारणांमुळे मुलांना करावा लागतो डिप्रेशनचा सामना; लक्षणे दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला

उन्हाळ्यात बाळाची त्वचा पुरळ मुक्त ठेवण्यासाठी कॉटन नॅपी घालणं चांगलं आहे. लंगोट बदलताना बाळाच्या त्वचेवर थोडी हवा येऊ द्या. याशिवाय लहान बाळाल पुरळ येण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्वचा कोरडी ठेवण्यासाठी बेबी क्रीम किंवा पावडर (Baby Care Tips) वापरा. उन्हाळ्यात घाम येणे आणि शरीरावर हवा खेळती राहत नसल्यामुळे मुलांना घामोळ्यांचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे बाळाला फक्त सुती कपडे वापरा. त्यामुळे त्याच्या शरीरात हवा खेळती राहील. घामोळ्यांसाठी बेबी पावडर लावा परंतु तेल अजिबात वापरू नका.

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

How To Take Care Babies
Parenting Tips: मुलांच्या टिफीन बॉक्समध्ये रूचकर आणि पौष्टिक हे पदार्थ असायलाच हवेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com