Skin Care Tips : होळीच्या रंगांमुळे त्वचा लाल पडलीये? या घरगुती उपायांनी घ्या चेहऱ्याची काळजी

Skin Care After Holi : रंगपंचमी खेळल्यानंतर अनेकजणांच्या चेहऱ्यावरचा रंग लवकर निघत नाही. रंगांमध्ये असणारे केमिकल आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. हे रंग त्वचेवरुन सहसा निघत नाही.
Skin Care Tips, Skin Care After Holi
Skin Care Tips, Skin Care After Holi Saam tv

Home Remedies For Skin Rashes :

रंगपंचमी खेळल्यानंतर अनेकजणांच्या चेहऱ्यावरचा रंग लवकर निघत नाही. रंगांमध्ये असणारे केमिकल आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरतात. हे रंग त्वचेवरुन सहसा निघत नाही.

रंगांमध्ये असणारे रासायनिक घटक तुमच्या त्वचेला हानी पोहोचवते. हे रंग काढताना चेहरा लाल होतो, त्वचेवर (Skin) पुरळ येतात किंवा त्वचा जळजळू लागते. जर तुमच्या त्वचेला त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय (Home Remedies) करुन पाहा.

1. खोबरेल तेल

रंग काढून टाकण्यासाठी खोबऱ्याचे तेल (Coconut Oil) किंवा तूपाने चेहऱ्याची मालिश करा. यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणार नाही. चेहऱ्याला त्वचा हायड्रेट करेल. निस्तेज किंवा कोरडी होण्यापासून रोखेल

Skin Care Tips, Skin Care After Holi
Hair Care Tips : लांब आणि दाट केस हवे आहेत? या घरगुती टिप्स फॉलो करा

2. कोरफड जेल

कोरफड त्वचेसाठी फायदेशीर आहे. रंग काढून टाकल्यानंतर त्वचेसाठी खाज सुटली किंवा लालसरपणा येत असेल तर कोरफड जेल लावा. त्वचेच्या जळजळीपासून लगेच आराम मिळेल आणि लालसरपणा कमी होईल.

3. दही आणि बेसन

रंग काढल्यानंतर त्वचेला जळजळ होत असेल तर बेसन, दही आणि कोरफड जेलची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट त्वचेवर लावून सुकल्यानंतर थोड्यावेळाने पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेचा लालसरपणा आणि जळजळ कमी होईल.

Skin Care Tips, Skin Care After Holi
Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचा ड्राय-तेलकट का होते? कशी घ्याल काळजी?

4. आइस क्युब

त्वचा अधिक जळजळत असेल, खाज सुटत असेल अशावेळी आइस क्युबचा वापर करा. यामुळे त्वचेला आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com