Online Fraud: महिलांनो, ऑनलाइन जगात वावरताना कशी घ्याल काळजी? ट्रॅप कसा ओळखाल? वाचा सविस्तर

Cyber Security: सोशल मीडियावर फसवणूक झालेल्या घटना समोर येत असून ज्या व्यक्तींसोबत फसवणूक झाले त्यात महिलांचे तक्रारी करण्याचे प्रमाण जास्त आहे.
Online Fraud
Online FraudSAAM DIGITAL
Published On

Online World Women Need Be Aware

सध्याच्या काळात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वं वयोगटातील व्यक्ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यातच सोशल मीडियावर फसवणूक झालेल्या घटना समोर येत असून ज्या व्यक्तींसोबत फसवणूक झाले त्यात महिलांचे तक्रारी करण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण महिला आणि मुलं हे सायबरच्या (Cyber) विश्वातील सॉफ्ट टार्गेट्स आहेत. त्यावेळी सर्वांनीच ऑनलाईन विश्वास वावरताना काही महत्वाच्या गोष्टींची सावधगिरी बाळगण आवश्यक आहे.

Online Fraud
Money Saving Tips | Lifestyle मध्ये करा हे बदल, पैशांची होईल बचत

बऱ्याचदा ऑनलाईन शॉपिंग करताना महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते किंवा लहान मुलांचे फोटो पोस्ट करणे सुद्धा सोशल मीडियावर धोकादायक (Dangerous )झाले आहे. त्यामुळे काही महिलांना सायबर गुन्हांच्या शिकार झाल्यानंतर काय करावे माहिती नसते अनेकवेळा भिती पोटी त्या पोलिसांत तक्रारी करायला घाबरतात. मात्र त्याआधीचं महिलांनी असो वा सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या प्रत्येकाने खाली दिलेल्या गोष्टींची काळजी घ्यावी.

सोशल मीडियावर पोस्ट करताना काय काळजी घ्यावी?......

सोशल मीडियावर स्वत:चे फोटो पोस्ट करताना आपले अकाऊंट प्रायव्हेट असावे,जेणेकरुन आपले फोटो फक्त आपले मित्रांपर्यत राहतात तसेच कॉमेंट्स आणि शेअरिंगचे पर्याय बंद ठेवता येतात.

प्रतिक्रिया- आपले अकाऊंट जर प्रायव्हेट नसल्यास अनेकदा काही व्यक्ती चुकीच्या प्रतिक्रिया करतात त्यावेळी त्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवावेत जेणेकरून पोलिसांना दाखवताना कामाला येतात.

अनेक पर्याय- सोशल मीडियावर अनेकदा ब्लॉक तसेच अनफ्रेंड, अनफॉलो हे पर्याय उपलब्ध आहेत.

वयक्तित माहिती- सोशल मीडिया आपण कुठे चाललो आहोत किंवा आपलं घर ,रुटीन किंवा मुलांबद्दलची माहिती अशी दररोजच्या जीवनाची माहिती देणे टाळावे.

मुलांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे धोकादायक?

आपल्यापैकी बऱ्याच महिला या त्यांच्या लहान मुलांचे फोटो सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात मात्र अनेकवेळा लहान मुलांच्या फोटो आणि व्हिडिओचा चुकीचा उपयोग केला जाऊन मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

सध्या एआयचा वापर वाढतोय त्यामुळे लहान मुलांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे धोकादायक आहे.

ऑनलाईन शॉपिंग-

ज्यावेळी शॉपिंग प्लॅटफॉर्मवरुन शॉपिंग करताय ती साईट खात्रीलायक आहे का तपासा.

कोणत्याही शॉपिंग साईटवरुन शॉपिंग करु नये कारण अनेकवेळा खोट्या साईटवरुन शॉपिंग केल्याने तुमच्या बॅंक डिटेल्यची सर्व माहिती चुकीच्या व्यक्तीकडे जाऊ शकते.

शॉपिंग साईट वापरताना ती साईट ओरिजनल आहे का तपासा , त्या साईटचे लोगो किंवा नावाच्या लोगोमध्ये किंचीतसा बदल असतो.

बेवसाईटचे कीप मी लॉग्ड इन किंवा रिमेम्बर मी सारखे पर्याय निवडू नये.

डिस्काउंट कुपन्स तसेच अनेक फेस्टिव्हल ऑफर्सचे कुपन्स यांच्या मोहात अडकू नये.

गुगलवरुन एखाद्या बेवसाईटचा कस्टमर केअर नंबर घेऊ नये कारण चुकीच्या नंबरने तुमची फसवणूक होण्याशी शक्यता असते.

ओटीपी कधीही कोणत्या अनोळखी व्यक्तींशी किंवा कोणत्या खात्री नसलेल्या साईटवर शेअर करु नये.

Online Fraud
Lifestyle For Slow Ageing : तिशीच्यानंतर 'या' गोष्टींच सेवन करणे टाळा, अन्यथा येईल अकाली वृद्धतत्व

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com