Online Fraud : ऑनलाइन बटाटे खरेदी करून सव्वादोन लाखात फसवणूक; सायबर पोलिसांनी तरुणास घेतले ताब्यात

Beed News : सातारा जिल्ह्यातील फलटन येथील एका तरुणाने बटाटे खरेदी करायचे असल्याची जाहिरात सोशल मोडियावर टाकली होती.
Online Fraud
Online FraudSaam tv
Published On

बीड : सोशल मीडियावर टाकलेली जाहिरात पाहून व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एका (Beed) तरुणाने बटाटे खरेदी करून त्याचा मोबदला दिला नाही. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून सायबर पोलिसांनी (Cyber Police) सदर तरुणास ताब्यात घेतले आहे. (Live marathi News)

Online Fraud
Ulhasnagar News : कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलांनी कपड्यांची केली चोरी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटन येथील एका तरुणाने बटाटे खरेदी करायचे असल्याची जाहिरात सोशल मोडियावर टाकली होती. ती पाहून बीड येथील एका बटाटा व्यापाऱ्याने त्याच्याशी संपर्क साधत तब्बल १२ टन बटाटे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवले. परंतु यानंतर या तरुणाने पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक (fraud) झाल्याचे लक्षात येतात संबंधित व्यापाऱ्याने बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Online Fraud
Heena Gavit News : ४० वर्षात आदिवांसींचा विकास केला नाही, आता तेच न्यायाची गोष्ट करताय; खासदार हिना गावित यांची राहुल गांधींवर टीका

तरुणास घेतले ताब्यात 

सायबर पोलिसांकडून सदर प्रकरणाचा तपास करत तरुणाचा शोध घेत या तरुणास अटक केली. अशाच पद्धतीने त्याने इतर काही ठिकाणीही फसवणूक केल्याचे आता समोर येत आहे. दरम्यान याविषयीचा अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com