OnePlus चा प्रिमियम फोन झाला स्वस्त; 50MP कॅमेरा, १२०Hz रिफ्रेश रेट आणि बरचं काही... जाणून घ्या

OnePlus 12 latest news : वनप्लस १२ दोन महिन्यांपूर्वी लाँच झाला. बाजारात या स्मार्टफोनची खूप मागणी आहे. या फोनची बेसिक व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रुपये आहे. तर हायएन्ड व्हेरिएन्टची किंमत ६९,९९९ रुपये आहे.
 OnePlus 12
OnePlus 12 OnePlus

Oneplus 12 Price in India:

वनप्लस १२ दोन महिन्यांपूर्वी लाँच झाला. बाजारात या स्मार्टफोनची खूप मागणी आहे. या फोनची बेसिक व्हेरिएंटची किंमत ६४,९९९ रुपये आहे. तर हायएन्ड व्हेरिएन्टची किंमत ६९,९९९ रुपये आहे. तुम्हाला हा मोबाईल खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. या मोबाईलविषयी जाणून घेऊयात.

वनप्लस १२ ची किंमत

प्लिपकार्टवर या फोन खरेदीवर १ टक्क्यांची सूट आहे. फ्लिपकार्टवर या फोनची किंमत ६४,०९९ रुपये आहे. या व्यतिरिक्त HDFC Bank credit bank युजर्स ईएमआयच्या मार्फत तुम्ही २,५०० रुपये वाचवू शकता. तसेच १२ महिन्यांच्या EMI वर फोन खरेदीवर अधिक ३५०० रुपयांची ऑफर मिळत आहे. या डिस्काऊंट ऑफरमार्फत तुम्ही ६०५६६ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

 OnePlus 12
Mobile Care Tips: तुमचा फोन सारखा गरम होतोय? 'या' चुका टाळा

वनप्लस १२ चे खास फिचर्स

वनप्लस १२ मध्ये ६.८२ इंच डिस्प्ले मिळत आहे. फोनचा रिफ्रेश रेट १२०HZ आहे. तसेच वनप्लस १२ मध्ये स्मूथ डिस्प्ले मिळत आहे. फोन फ्लोई एमराल्ड आणि सिल्की ब्लॅक रंगात हा मोबाईल मिळतो. सॉफ्टवेयरच्या मार्फत फोनमध्ये OxygenOS आणि आऊट ऑफ बॉक्स Android 14 वर चालतो. फोन स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर पेक्षा कमी आहे.

 OnePlus 12
Poco Mobile: आज लॉन्च होणार 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला Poco X6 Neo; जाणून घ्या किंमत आणि इतर फिचर्स

१००W चार्जिंग सपोर्ट

बॅटरीविषयी बोलायचे झालं तर फोनमध्ये ५४०० 'एमएएच'ची मोठी बॅटरी मिळते. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जवर पूर्ण दिवस मोबाईल वापरू शकता. या व्यतिरिक्त बॅटरी १००w supervooc आणि 50w AIRVOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनला मिनिटांत चार्जिंग होते. वायब्रेशन फीडबॅकसाठी फोनमध्ये हॅप्टिंक मोटर आणि जेस्चर, ऑन-स्क्रिन नेव्हिगेशन सपोर्ट, अलर्ट स्लाइडर, पॉवर बटन आणि व्हॉल्यूम बटन देखील मिळत आहे.

जबरदस्त कॅमेरा

कॅमेराच्या बाबतीत वनप्लस १२ हा फोन जबरदस्त आहे. फोनमध्ये हॅसलब्लेड कॅमेरा आहे. नाइटस्कॅप आणि पोर्टेट मोड सारखे फिचर्स मिळत आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा, ४८ मेगापिक्सल वाइड कॅमेरा, ३* ऑप्टिकल झूमसोबत ६४ मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा, ४८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देखील आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com