Rohini Gudaghe
आपण बॅकग्राउंडला अनेक अॅप्स तसेच ठेवतो. त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होते अन् फोन जास्त गरम होतो.
बॅटरी संपेल म्हणून फोन फुल्ल चार्जिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा 100 टक्के झाल्यानंतरही चार्जिंग सुरु ठेवल्यास फोन गरम होतो.
स्क्रीनचा ब्राइटनेस जास्त असेल तर त्याचाही परिणाम बॅटरीवर होतो. यासाठी फोनचा ब्राइटनेस आवश्यकता नसेल तेव्हा कमी ठेवा.
फोनमध्ये अॅप्स अपडेट ठेवले तर बॅटरी गरम होणार नाही. कारण अनेक अॅप्समध्ये असलेले बग फोनच्या सिस्टिमवर ताण वाढवतात. त्यामुळे फोन गरम होतो.
फोन गरम झाला तर त्याचं कव्हर थोड्या वेळासाठी काढून ठेवा. त्यामुळे फोन थंड होईल.
स्मार्टफोनसोबत मिळालेला चार्जर आणि यूएसबी खराब झाल्यानंतर आपण कोणत्याही चार्जर आणि यूएसबीने फोन चार्ज करतो. त्यामुळे बॅटरी गरम होण्याची समस्या वाढते.
फोनचा कॅमेराही अनेकदा मोबाइल गरम होण्याचं कारण बनतो. फोनमध्ये सतत फोटो काढणे किंवा बराच वेळ व्हिडिओ बनवल्याने कॅमेरा आणि फोन गरम होतो.
आपला फोन सारखा सारखा गरम होतो. त्यामुळे फोन फुटल्याच्या घटना घडतात. त्यामुळे फोन गरम होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे असते.