Obesity Causes : काही वर्षात जगातील 90 टक्याहून अधिक लोकांना जडणार लठ्ठपणा, तज्ज्ञांनी केला दावा

Obesity Causes Disease : सध्या लठ्ठपणा हा आपल्या देशात होणाऱ्या मृत्यूंच्या संभाव्य कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे.
obesity
obesity Saam tv
Published On

Obesity Causes and Effects : जंकफूड, खाण्यापिण्याची बदलेली शैली व योग्य वेळी आहार न घेण्याच्या चुकीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सध्या लठ्ठपणा हा आपल्या देशात होणाऱ्या मृत्यूंच्या संभाव्य कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे.

लठ्ठ रुग्णांपैकी ९०% रुग्ण हे डॉक्टरांनी सूचित केलेले उपचार अवलंबविण्यास विलंब करतात आणि त्यामुळे येत्या काळात मधुमेह, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, किडनी, फॅटी लिव्हर तसेच गुडघेदुखी आणि मणक्याच्या आजारासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.

obesity
Husband Wife Relation: लग्नानंतर पती-पत्नीने 'या' गोष्टी आर्वजून कराव्यात!

एकदा का हा आजार (Disease) जडल्यानंतर हेच रुग्ण कालांतराने विविध व्याधी सोबत घेऊन उपचारासाठी येत असल्याचे देखील समोर आले आहे असे मत लँपरोस्कोपिक बँरिएट्रीक सर्जन डाँ.शंशाक शहा यांनी नोंदविले आहे.

वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या २०२३ अॅटलसनुसार जगातील ५१% किंवा ४ अब्जाहून अधिक लोक पुढील १२ वर्षांत लठ्ठ किंवा जास्त वजनाचे (Weight) असतील. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार २०३५ पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही जास्त वजन किंवा लठ्ठपणाने ग्रासलेली असेल, असेही या अहवालात स्पष्ट केले आहे.

obesity
Aishwarya Narkar : वय हा केवळ आकडाच असतो

डॉ. शशांक शाह, संचालक आणि प्रमुख लॅपरोस्कोपिक बॅरिएट्रिक सर्जन, लॅप्रो ओबेसो सेंटर यांनी सांगितले की, लठ्ठ रुग्णांपैकी ९०% रुग्ण डॉक्टरांनी सुचविलेल्या उपचारांना उशीर करतात आणि भविष्यात गंभीर समस्यांना बळी पडतात. विविध अहवालांनुसार मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण २०४० पर्यंत म्हणजेच त्यांच्या प्रौढावस्थेत दुप्पट होईल. लठ्ठपणाच्या वाढत्या प्रकरणांमागील घटक म्हणजे गॅझेटचे व्यसन, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव आणि चुकीच्या आहाराच्या सवयी.

जास्त वजन असलेल्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भारत लवकरच लठ्ठपणाची राजधानी बनेल ही शक्यता नाकारता येत नाही.लठ्ठपणा एखाद्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. यामुळे तणाव (Stress), नैराश्य, चिंता, निराशा, एकाकीपणा आणि आत्मसन्मान कमी होऊ शकतो.

obesity
Child Obesity: लहान मुलांमध्येही दिसतोय लठ्ठपणा, 'अशी' घ्या काळजी

डॉ.शाह पुढे सांगतात की, आम्ही १० वर्षांपासून लठ्ठ व्यक्तींना पाठींबा देणारा सपोर्ट ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न करत होतो. यामध्ये रुग्ण उघडपणे चर्चा करता येते त्यांचे वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबत व्यक्त होता येते ज्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते. तसेच, आम्ही असे रुग्ण पाहिले आहेत ज्यांनी लठ्ठपणाच्या उपचारांसाठी यापुर्वी सल्ला घेतला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. काही वर्षांनंतर हेच रुग्ण सांधेदुखी, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्या, फॅटी लिव्हर, स्लीप एपनिया आणि इतर आरोग्याच्या समस्यांमी त्रासून याठिकाणी परत आले.

स्लीप एपनिया असलेल्या २८ वर्षांच्या ग्योडेन डी आल्मेडा या तरुण रुग्णाला C-PAP मशीन, डायबिटीस हायपरटेन्शनचा सल्ला देण्यात आला होता. बैठ्या जीवनशैलीमुळे त्याचे वजन १५८ किलो आणि बीएमआय ५३.४ इतका होता. रुग्णाच्या आईच्या म्हणण्यानुसार, लहानपणी त्याला दम लागणे आणि चालताना त्रास होणे अशी लक्षणे दिसून आली मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने भविष्यात त्याचे लठ्ठपणासारख्या आजारात रुपांतर झाले.

obesity
Priyanka Chahar Choudhary : ओठांवरती लाली, डोळ्यात काजळ; तुझी मादक अदा अन् घायाळ करणारी नजर

४६ वर्षीय रुग्ण प्रिती सेखसारिया हिचे वजन १३७ किलो इतके होते बीएमआय हा ५०.३ इतका उच्च होता. प्रख्यात डायबेटोलॉजिस्ट डॉ शशांक शाह यांच्याकडे तिला पाठवण्यात आले. तिला गेल्या १० वर्षांपासून चक्कर, गुडघेदुखी, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ती तणावाखाली वावरत होती आणि भावनीकदृष्ट्या खचली होती. चक्कर येऊन तोल गेल्याने पडण्याची, अपघात होण्याची भीती वाटत होती. तिने जानेवारीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

तिला अन्नाची ऍलर्जी होती आणि तिने अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला पण शस्त्रक्रिया करण्यास घाबरत होती आणि पोस्ट-ऑप केअरबद्दलही तिला चिंता वाटत होती. तिने गुगलवर शस्त्रक्रियेचे फायदे-तोटे शोधले. शस्त्रक्रियेनंतर ४ महिने झाले असून तिने ३० किलो वजन कमी केले आहे. अन्नाची ऍलर्जी दूर झाल्या आहेत, आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाब विरोधी औषधांचे डोस देखील कमी झाले आहेत. अहवालानुसार तिची शस्त्रक्रियापूर्व HBA1C पातळी ७.८ आणि शस्त्रक्रियेनंतरची पातळी ५.७ होती. ती आता आनंदी जीवन जगत आहे आणि तिचा आत्मविश्वास देखील वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com