Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Parotid Tumor : जबड्याजवळ, गालावर किंवा कानाखाली वेदना न होणारी गाठ दुर्लक्षित करू नका. पॅरोटिड ट्यूमरची 7 प्रमुख लक्षणे, तपासण्या आणि उपचारांबाबत तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
parotid tumor symptoms
parotid tumor symptomsmeta ai
Published On: 

जबड्याजवळ, गालावर किंवा कानाच्या खाली छोटीशी गाठ जाणवली की अनेकजण ती साधी सूज असेल, लिम्फ नोड्स किंवा किरकोळ संसर्ग समजून दुर्लक्ष करतात. यामध्ये गाठ दुखत नसेल तर काळजी करण्याचं कारण नाही, असं मानलं जातं. मात्र तज्ज्ञांच्या मते, अशी वेदनादायक सूज पॅरोडिट ग्रंथीतल्या ट्यूमरची असू शकते.

पॅरोटिड ग्रंथी या शरीरामधल्या सर्वात मोठ्या लाळग्रंथी असून त्या कानाच्या पुढच्या भागात असतात. या ग्रंथी लाळ तयार करतात, जी चावणं, गिळणं आणि पचन प्रक्रियेत मदत करते. या ग्रंथींमध्ये पेशींची असामान्य वाढ झाल्यावर पॅरोटिड ट्यूमर होऊ शकतो. यातले अनेक ट्यूमर हे कॅन्सर नसलेले म्हणजेच सौम्य असतात. पण काही ट्यूमर जीवघेणेही असू शकतात.

parotid tumor symptoms
Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

मुंबईतल्या SSO हॉस्पिटलचे Head and Neck Cancer Surgeon डॉ. अमित चक्रवर्ती यांनी सांगितलं की, जबड्याजवळ, गालावर किंवा कानाच्या खाली वेदना न होणारी गाठ दुर्लक्षित करू नका. ट्यूमर जर वाढला तर आसपासच्या नसांवर आणि स्नायूंवर दबाव येऊ शकतो. पुढे आपण याची लक्षणे जाणून घेणार आहोत.

पॅरोटिड ट्यूमरची 7 प्रमुख लक्षणं

  1. जबड्याजवळ, गालावर किंवा कानाखाली दुखणारी गाठ किंवा सूज

  2. चेहऱ्याच्या एका बाजूला मुंग्या येणे किंवा संवेदना कमी होणे

  3. चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी जाणवणे

  4. जेवण चावताना त्रास किंवा तोंड पूर्ण उघडताना त्रास होणे

  5. अन्न किंवा द्रव गिळताना अडचण

  6. कान किंवा जबड्याच्या आसपास वेदना

  7. चेहऱ्याच्या हालचाली किंवा दिसण्यात बदल

parotid tumor symptoms
BP Medicine : ब्लड प्रेशरची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?

तज्ज्ञांच्या मते, गाठ दुखायला लागण्याची वाट पाहणं योग्य नाही. डॉक्टर गरजेनुसार अल्ट्रासाऊंड, MRI, CT स्कॅन किंवा बायोप्सीच्या मदतीने निदान करतात. ट्यूमर सौम्य आहे की कॅन्सरग्रस्त, यावर उपचार ठरतात. शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी किंवा दोन्ही उपचारांची आवश्यकता लागू शकते.

कॅन्सरग्रस्त ट्यूमरवर वेळेत उपचार झाला नाही तर तो आसपासच्या ऊती किंवा लिम्फ नोड्सपर्यंत पसरू शकतो. काही प्रकरणांमध्ये चेहऱ्याच्या नसांना कायमस्वरूपी नुकसान होऊन चेहऱ्यावर कमजोरी किंवा अर्धांगवायूसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे जबड्याजवळ किंवा कानाखाली गाठ जाणवत असेल तर स्वतःहून निष्कर्ष न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com