Sakshi Sunil Jadhav
बाजारात पॉलिश केलेली किंवा अन्य धातूंची भेसळ असलेली भांडीही मिळतात. त्यामुळे खरेदी करण्याआधी काही सोप्या पद्धतींनी धातूची तपासणी करता येते.
शुद्ध तांब्याचा रंग साधारण गडद लाल, तांबूस किंवा नारिंगी-तपकिरी दिसतो.
शुद्ध पितळ तांबे आणि जस्ताचे मिश्रधातू असून त्याचा रंग सोनेरी पिवळा किंवा फिकट पिवळा असतो.
शुद्ध तांबे आणि पितळ अचुंबकीय असल्याने त्यांच्यावर चुंबक सहजपणे चिकटत नाही.
चुंबक भांड्याला जोराने चिकटत असल्यास त्यात लोखंड किंवा स्टीलचा भाग अथवा धातूची कोटिंग असण्याची शक्यता असते.
एखाद्या लपलेल्या भागावर हलकी Scratch दिल्यावर आत आणि बाहेरचा रंग सारखा असल्यास धातूची जाडी आणि एकसंधता तपासता येते.
वरचा थर तांबे-पितळेचा आणि खालचा भाग पांढरा किंवा करडा दिसल्यास ते प्लेटेड किंवा कोटेड भांडे असू शकते.
तांब्याच्या भांड्यावर हलके टिचकी मारल्यास तुलनेने खोल आणि मंद आवाज, तर पितळेवर अधिक स्पष्ट व किणकिणता आवाज ऐकू येतो.