Sakshi Sunil Jadhav
१०० ग्रॅम कोरड्या राजम्यात २३-२४ ग्रॅम प्रोटीन असते, तर छोलेमध्ये सुमारे १९ ग्रॅम प्रोटीन मिळते.
एक कप शिजवलेल्या राजम्यात साधारण १३-१४ ग्रॅम, तर छोलेमध्ये सुमारे १४-१५ ग्रॅम प्रोटीन मिळू शकते.
योग्य पद्धतीने शिजवल्यास राजमा आणि छोलेमधील एकूण प्रोटीनमध्ये मोठी घट होत नाही, उलट ते पचायला सोपे होतात.
कच्चा किंवा अर्धवट शिजलेला राजमा पोटाच्या समस्या निर्माण करू शकतो, त्यामुळे तो पूर्णपणे मऊ होईपर्यंत शिजवावा.
एका कप शिजवलेल्या राजम्यात सुमारे १२-१३ ग्रॅम, तर छोलेमध्ये सुमारे ११ ग्रॅम फायबर मिळू शकते.
एक कप शिजवलेल्या राजम्यात सुमारे २१० कॅलरी, तर तेवढ्याच छोलेमध्ये सुमारे २५० कॅलरी असू शकतात.
राजमा किंवा छोले ८-१० तास भिजवून त्यातील पाणी फेकून दिल्यास काही अँटीन्यूट्रिएंट्स कमी होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होऊ शकते.
कडधान्यांमध्ये मेथिओनिन हे आवश्यक अमिनो अॅसिड कमी असल्याने तांदूळ किंवा इतर संपूर्ण धान्यांसोबत खाल्ल्यास आहार अधिक संतुलित होतो.