BP Medicine : ब्लड प्रेशरची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का?

Sakshi Sunil Jadhav

बदलती जीवनशैली

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना तिशितच BP च्या समस्येला सामोरं जावं लागतं. अशा वेळेस ब्लड प्रेशरची औषधं आयुष्यभर घ्यावी लागतात का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

blood pressure medicine

तज्ज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकालाच आयुष्यभर औषधं घ्यावी लागत नाहीत. हे व्यक्तीच्या वयावर, आरोग्यावर आणि उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असतं.

BP medicine

सर्वात महत्त्वाची बाब

हायपरटेन्शन नियंत्रणात राहिलं नाहीतर हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनीचे आजार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या होण्याचा धोका वाढू शकतो.

hypertension treatment

महत्त्वाचे बदल

लाइफस्टाइलमध्ये बदल केल्यावर फायदा होऊ शकतो. म्हणजेच वजन कमी करणं, नियमित व्यायाम, मीठाचं प्रमाण कमी करणं आणि संतुलित आहार घेणं.

BP medication

ताणावर नियंत्रण ठेवा

ताण कमी करणं, धूम्रपान सोडणं आणि मद्यपान मर्यादित करणं यामुळेही रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

BP medication

औषधांचा डोस कमी

तुम्ही रोज सकारात्मक बदल केला तर तुमचा BP नियंत्रित राहू शकतो आणि डॉक्टर औषधांचा डोस कमी करण्याचा विचार करू शकतात.

BP medication

लक्षात ठेवा

रक्तदाबाची रीडिंग नॉर्मल आली म्हणून औषधं अचानक बंद करणं धोकादायक ठरू शकतं; औषधांचा परिणाम असल्यामुळेही बीपी नियंत्रणात असू शकतो.

BP medication

BP medicationमहत्त्वाची सूचना

ही माहिती जनजागृतीसाठी आहे. रक्तदाबाची औषधं स्वतःहून सुरू, बंद किंवा कमी करू नका; त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. साम टिव्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

BP medication

NEXT: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

Chanakya Niti | meta ai
येथे क्लिक करा