Cosmetic injections: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सौंदर्य वाढवणारी इंजेक्शन वापरावर बंदी!

Central Government: स्किन ब्राइटनिंग आणि अँटी-एजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शन उपचारांवर CDSCO ने कठोर भूमिका घेतली आहे. कॉस्मेटिक्सचा वापर उपचार म्हणून करता येणार नसल्याचं स्पष्ट करत सरकारने ब्युटी क्लिनिक्ससाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
Cosmetic injections
Cosmetic injectionssaam tv
Published On

ग्लोईंग त्वचा, तरुण दिसणं किंवा चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनच्या उपचारांवर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतलीये. ब्युटी क्लिनिक आणि एस्थेटिक सेंटर्समध्ये वाढत चाललेल्या अशा प्रक्रियांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजेच Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) ने महत्त्वाची सूचना जारी केलीये.

१८ मे रोजी जारी करण्यात आलेल्या सार्वजनिक नोटिसमध्ये CDSCO ने स्पष्ट केलं की, इंजेक्शनद्वारे दिली जाणारी कोणतीही ट्रिटमेंट ‘कॉस्मेटिक’ म्हणजे सौंदर्यप्रसाधन म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. Drugs and Cosmetics Act १९४० अंतर्गत अशा उत्पादनांना परवानगी नसल्याचं सांगण्यात आलंय. “कोणतेही कॉस्मेटिक डॉक्टर किंवा एस्थेटिक क्लिनिकमार्फत इंजेक्शन स्वरूपात वापरता येणार नाही,” असं या नोटिसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Cosmetic injections
High Cholesterol: ही ४ विचित्र लक्षणं दिसली तर समजा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचतंय घाण कोलेस्ट्रॉल

सध्या बाजारात स्किन ब्राइटनिंग, अँटी-एजिंग आणि फेस एन्हान्समेंटसाठी अनेक इंजेक्शनांचे उपचार मोठ्या प्रमाणात केले जातात. अनेक ब्युटी क्लिनिक्स आणि कॉस्मेटिक सेंटर्समध्ये अशा ट्रिटमेंट्सची जाहिरात केली जाते. मात्र सरकारने आता ब्युटी प्रोडक्ट्स आणि वैद्यकीय उपचार यांच्यात स्पष्ट सीमारेषा आखलीये.

डॉ. कबीर सरदाना यांनी सांगितलं की, अनेक कॉस्मेटिक इंजेक्शन प्रक्रियांमध्ये वापरले जाणारे केमिकल्स वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. ज्या त्वचेच्या समस्यांसाठी इंजेक्शनची गरज नसते त्यासाठीही अशा उपचारांचा वापर वाढला आहे. मेसोथेरपी आणि मेलाझ्मासाठी दिली जाणारी इंजेक्शनांद्वारे करण्यात येणाऱ्या बहुतांश उपचारांना अमेरिकेच्या FDA ची मान्यता नाही. ते ऑफ-लेबल पद्धतीने वापरले जातात.

Cosmetic injections
Bad cholesterol: हे एक पिवळं ड्रिंक रक्तवाहिन्यांमधून खेचून बाहेर काढेल कोलेस्ट्रॉल

तज्ज्ञांच्या मते, अशा उपचारांमुळे रुग्णांना अनेक दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो. यात त्वचेच्या समस्या किंवा अ‍ॅटिपिकल मायकोबॅक्टेरियल इन्फेक्शनसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय या प्रक्रियांमुळे रुग्णांवर आर्थिक भारही वाढतो.

कॉस्मेटिक्सचा वापर फक्त आकर्षक दिसण्यासाठीच

CDSCO ने आपल्या सूचनेत स्पष्ट केलं की, कॉस्मेटिक्सचा वापर फक्त स्वच्छता, सौंदर्य वाढवणं, आकर्षक दिसणं इतकाच मर्यादित आहे. त्याचा वापर उपचार म्हणून करता येणार नाही.

Cosmetic injections
Dream meaning: तुम्हालाही वारंवार एकच स्वप्न पडतंय का? स्वप्नशास्त्रात सांगितलेत यामागचे गूढ संकेत

या प्रकरणात कोणताही नियमभंग आढळल्यास ग्राहक, डॉक्टर आणि उत्पादकांनी CDSCO तसंच राज्य परवाना प्राधिकरणांकडे तक्रार नोंदवावी, असं आवाहनही सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com