Navratri Ghatasthapana
Navratri GhatasthapanaSaam Tv

Navratri Ghatasthapana 2025: घटस्थानपनेच्या दिवशी चुकूनही 'या' ४ चूका करू नका, पूजेत पडेल खंड

Navratri Ghatasthapana: नवरात्री २०२५ मध्ये घटस्थापना करताना या ४ चुका टाळा. योग्य नियम पाळून देवीची पूजा करा आणि घरी सुख, शांती व समृद्धी आणा.
Published on

हिंदू धर्मात विविध सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पितृ पक्ष संपला की अश्विन महिन्याची सुरूवात होते. अश्विन महिन्याच्या सुरूवातील नवरात्रोत्सव असतो हिंदू धर्मात अश्विन नवरात्रीला विशेष महत्व आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते.

Navratri Ghatasthapana
Navratri Colour History: लाल, पिवळा, हिरवा... नवरात्रीचे रंग कोणी ठरवले? काय आहे नऊ रंगाचा इतिहास?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. प्रतिपदा तिथीला घटस्थापनेने नवरात्रीची सुरूवात होते. या दिवशी घटस्थापनेचे दोन शुभ मुहूर्त आहेत. पहिला सकाळी ६:०९ ते ८:०६ पर्यंत आहे. दुसरा अभिजित मुहूर्त आहे जो सकाळी ११:४९ ते दुपारी १२:३८ पर्यंत असतो. या दोन्ही वेळा शुभ आहेत.

Navratri Ghatasthapana
Navratri Rules: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

घटस्थापनेचे काही नियम आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

१) घटस्थापनेपूर्वी, देवघर स्वच्छ करा. त्यानंतर कलश स्वच्छ करा .

२) स्वयंपाकघर किंवा शौचालयाजवळ घटस्थापना करू नका.

३) पूजा व धार्मिक विधी दरम्यान तुटलेला कलश स्थापित करू नका.

४) घटस्थापनेच्या दिवशी एकदा कलश स्थापित केलेला मंदिराजवळून हलवू नका.

५) कलशला अशुद्ध हातांनी स्पर्श करू नये.

६) जर तुम्ही देवघरामध्ये घटस्थापना मांडली असेल तर नवरात्रीच्या काळात घर रिकामे ठेवू नका.

७) धार्मिक श्रद्धा आहे की घर रिकामे ठेवल्याने देवी नाराज होऊ शकते.

८) दुर्गा देवीची पूजा करताना कलशाची नियमित पूजा करा.

Navratri Ghatasthapana
Navratri 2025: नवरात्रीमध्ये घरी आणा या गोष्टी, माता लक्ष्मीच्या कृपेने होईल लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com