Manasvi Choudhary
22 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. नवरात्रीत उपवासाचे व्रत पाळले जातात.
नवरात्रीत लसूण- कांदा खात नाही. यामागचे नेमके कारण काय आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसात कांदा- लसूण खाणे वर्ज्य मानले जाते.
हिंदू पुराणानुसार, पूजेत किंवा नैवेद्याला कांदा आणि लसूण वापरू नये.
पौराणिक कथेनुसार, देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन होत असताना त्यातून ९ रत्ने बाहेरी आली आणि शेवटी अमृत बाहेर पडले. यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि देवतांना अमृत अर्पण केले.
राहू- केतू या दोन राक्षसांनी देवांचे रूप धारण केले आणि अमृत प्यायले. म्हणून भगवान विष्णूंनी त्या दोघांना शिक्षा म्हणून सुदर्शन चक्राने त्याचे दोन भाग केले.
यावेळी त्याचे डोके धडापासून वेगळे केले गेले अशी मान्यता आहे. त्यावेळी तेथे रक्त पडले. आणि त्यातून लसूण कांद्याची उत्पत्ती झाली.
म्हणूनच कांदे आणि लसूण उग्र वास देतात. तेव्हापासून पुराणात कांदा आणि लसूण राजसिक आणि तामसिक मानले गेले.