रविवारच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये पोहे किंवा उपम्याचाबेत बेत ठरलेला असतो. बऱ्याच व्यक्तींना पोहे आणि त्यावर लिंबू पिळून खायला प्रचंड आवडते. रविवारच्या दिवशी सुट्टी निमित्त सर्वजण घरी असतात. त्यामुळे रोजच्या डब्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवून खाऊ घालणं हा टास्क प्रत्येक घरातील गृहिणीला करावाच लागतो. आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी साधे पोहे नाही तर, तरी पोह्यांची रेसिपी सांगणार आहोत. अगदी ढाबा स्टाईल तरी पोहे तुम्ही घरच्याघरी तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया ढाबा स्टाईल तरी पोह्यांची रेसिपी.
1. चणे
2. तेल
3. सुके खोबरे
4. जिरे, मोहरी, तेजपत्ता आणि खडे मसाले
5. काळा मसाला
6. गरम मसाला
7. हिरवी कोथिंबीर
8. मिरची
9. शेंगदाणे
10. बटाटा
11. लिंबू
12. कढीपत्ता
13. पोह्यांचा कच्चा चिवडा
सर्वप्रथम तुम्हाला काळे चणे रात्रभर 8 ते 10 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. रात्रभर चणे भिजल्यानंतर सकाळी तरी पोह्यांची रेसिपी करायला घ्यायची आहे.
यासाठी सर्वप्रथम गॅसवर कुकरमध्ये चणे, चार ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून चणे शिजेपर्यंत शिट्टी काढून घ्यायची आहे.
आता तुम्हाला तरीच्या रेसिपीला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम एका कढईमध्ये किंवा मोठ्या पातेल्यात तेल ओतून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला सुक्या खोबऱ्यांचे काप, कांदा, लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि खडे मसाले मिसळवून चांगले परतून घ्यायचे आहेत. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. ही पेस्ट तयार करून बाजूला ठेवायची आहे आणि पुढील तयारीला लागायचं आहे.
आपण तरीसाठी लागणारा मसाला करून घेतला आहे. आता तुम्हाला एका पातेल्यात पाच ते सहा चमचे तेल ओतायचं आहे. त्यानंतर जिरे, मोहरी आणि तेजपत्ता यांचा तडका लावून घ्यायचा आहे. पुढे तुम्ही तयार केलेली कांद्याची पेस्ट या मसाल्यात ओतायची आहे आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे.
पुढे हळद, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मिश्रण एकत्रित करून शिजवलेले चणे देखील त्यामध्ये मिसळून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला यामध्ये पाणी आणि टोमॅटोचे मोठे काप घालून चण्याची तरी शिजवून घ्यायची.
आता आपल्याला पोहे बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी सर्वप्रथम पोहे भिजवून घ्यायचे आहेत. गॅसवर पातेलं ठेवून तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे आणि मिरची घालून परतून घ्यायचं आहे. पुढे दोन कांदे आणि बटाटा बारीक चिरून पातेल्यात टाकायचे आहेत. त्यानंतर भिजवलेले पोहे, लिंबू आणि हिरवीगार कोथिंबीर मिसळवून मिश्रण एकत्रित करायचं आहे. तुमच्या पोह्यांची रेसिपी तयार आहे.
एका डिशमध्ये सर्वप्रथम पोह्यांचा लेयर लावून घ्या. त्यानंतर गरमागरम तरी आणि चणे मसाल्याची लेयर लावून घ्या. त्यानंतर कच्च्या पोह्यांचे लेयर लावा आणि लिंबू त्याचबरोबर हिरवी कोथिंबीर आणि शेवटी पुन्हा लाल तरीची लेयर द्या. असे चमचमीत आणि झणझणीत तरी पोहे तयार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.