Dupatta Styling : दुपट्टा सावरताना नाही उडणार तारांबळ, या पद्धतीने वेअर केल्यास येईल स्टायलिश लूक

Dupatta Styling Tips : दुपट्टा कसा वेअर करावा जाणून घ्या. जेणेकरून सुंदर लूक येईल.
Dupatta Styling Tips
Dupatta Styling SAAM TV
Wearing a salwar suit
Wearing a salwar suit

सलवार सूट परिधान करणे

तुम्ही कितीही मॉडर्न झालात तरी तुमच्या कपाटात लेहेंगा, सलवार सूट आवर्जून असतात. काही विशेष कार्यक्रमात किंवा लग्न सोहळ्यात जाण्यासाठी महिला वेस्टर्न किंवा पारंपारिक लेहेंगा किंवा सलवार सूट परिधान करतात.

maintaining the dupatta
maintaining the dupattaCanva

दुपट्टा सांभाळताना तारांबळ उडते

लग्न सोहळ्यात आपण सलवार सूट घालतो. पण त्याचा दुपट्टा सांभाळताना आपली तारांबळ उडते. खरंतर दुपट्टा हा संपूर्ण लूकचे सौंदर्य वाढवतो. वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाईनचे दुपट्टे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

How to style dupatta?
How to style dupatta?Canva

दुपट्टा कसा स्टाईल करावा?

लेहेंगा किंवा सलवार सूट कितीही सुंदर असला तरी दुपट्टा नीट वेअर केला नाही तर मजा येत नाही. चला तर मग दुपट्टा कसा स्टाईल करायचा हे जाणून घेऊयात.

Fashionable look
Fashionable lookCanva

फॅशनेबल लूक

दुपट्टा योग्य वेअर केल्यामुळे तुमचा संपूर्ण लूक फॅशनेबल आणि स्टायलिश दिसतो.

Lehenga style dupatta
Lehenga style dupattaCanva

लेहेंगा स्टाईल दुपट्टा

दुपट्टा खांद्यावरून पुढे आणून यू आकारामध्ये वेअर करा. पिनच्या मदतीने दुपट्टा फिक्स करा. यामुळे तुमचे हात मोकळे राहतील आणि दुपट्टाही जागेवरून सरकणार नाही.

Dupatta like a shawl
Dupatta like a shawlCanva

शालीप्रमाणे दुपट्टा

सलवार सूटवर दुपट्टा दोन्ही खांद्यावर शालीप्रमाणे सोडा आणि पिनच्या मदतीने दुपट्टा फिक्स करा.

Try it with a belt
Try it with a beltYandex

बेल्टसोबत ट्राय करा

आज काल अनेक ड्रेसना फॅशनेबल बेल्ट लावलेले असतात. याचा वापर करून तुम्ही दुपट्टा पिन करू शकता. यासाठी तुम्ही दुपट्टा गळ्यात घालून त्याचे दोन्ही भाग पुढे बेल्टला अटॅच करावे.

Tie on the arm
Tie on the armYandex

हातावर बांधा

मित्रमंडळींसोबत कोणत्या कार्यक्रमाला जात असाल तर एका खांद्यावर दुपट्टा ठेवा आणि मागच्या बाजूने पुढे आणून दुसऱ्या हाताच्या मनगटावर बांधा. त्यामुळे हाताला छान लूक येईल.

Classic style
Classic styleYandex

क्लासिक स्टाईल

दुपट्ट्याचे प्लेट्स बनवून किंवा दुपट्टा मोकळा सोडून खांद्यावर पिनच्या सहाय्याने फिक्स करा. शक्यतो असे दुपट्टे फॉर्मल फंक्शनला छान वाटतात.

Tie like a hair band
Tie like a hair bandYandex

दुपट्टा हेअर बँड सारखा बांधा

जॉर्जेट किंवा शिफॉनचा दुपट्टा असल्यास त्याची पातळ घडी करून तो डोक्याभोवती हेअर बँड सारखा बांधा. यामुळे छान वेस्टर्न लूक होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com