

हवामान बदलाचा विपरीत परिणाम आता नागरिकांच्या झोपेवर होऊ लागलाय. भारतच एक जागतिक हॉटस्पॉट बनल्याचे ‘क्लायमेट सेंट्रल’च्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड झालीय. झोप कमी झाल्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे हा अहवाल सांगतो.
विशेष म्हणजे या अहवालानुसार महाराष्ट्रातील नागरिकांचं वार्षिक सरासरी 76.3 तास झोपेचे नुकसान झालं आहे. त्यातील 5.8 तास हवामान बदलाशी संबंधित आहेत. त्यातही मुंबईकरांचं आरोग्य जास्त बिघडलं आहे. मुंबईसह देशातील एकूण 107 शहरांचं विश्लेषण करण्यात आलं. त्यात हवामान बदलामुळे कोणत्या शहरात किती तास झोप घटलेली आहे ते पाहूया.
(वार्षिक प्रतिव्यक्ती)
चेन्नई - 93 तास
मुंबई - 84 तास
कोलकता - 80 तास
ज्या ठिकाणी आधीच रात्रीचे तापमान अत्यंत उष्ण असते, अशा ठिकाणी याचा मोठा परिणाम दिसून आला.दक्षिणेकडील राज्यांतील लोक हे दरवर्षी ७८ ते ९१ तास झोप गमावत आहेत. जागतिक पातळीवरही गेल्या पाच वर्षात रात्रीच्या उष्णतेमुळे व्यक्तीने दरवर्षी सरासरी सुमारे 56 तासांची झोप गमावली आहे.
कमी झोपेचे दुष्परिणाम पाहूया.
- वजन वाढते
- डायबेटीज
- अतिताण
- रोगप्रतिकार शक्तीत घटते
- कामगिरीवर परिणाम
- चुका वाढतात
- दुर्घटनांचा धोका
झोपेतील व्यत्यय ही सार्वजनिक आरोग्य आणि मानवी उत्पादकता या दोन्हींसाठी धोकादायक बाब मानली जावी, असं अभ्यासकांचं म्हणणे आहे. उत्तम आरोग्यासाठी प्रौढांना रात्री सात ते नऊ तासांच्या झोपेची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे मोठं संकट आहे. वाढतं तापमान कमी करण्यासाठी आर्थिक राजधानी मुंबईसह राज्यात सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण शांत आणि गाढ झोप झाली तरच नागरिक उत्तम काम करु शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.