Vada Pav Recipe: १० मिनिटांत बनवा मुंबईचा स्ट्रीट स्टाईल वडापाव; सोपी रेसिपी वाचा

Vada Pav Recipe Easy Recipe: वडा पाव खायला सर्वांनाच आवडतात. मुंबईत तर प्रत्येक ठिकाणी वडापावचा स्टॉल असतोच. तुम्ही घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल वडापाव बनवू शकतात.
Vada Pav Recipe
Vada Pav RecipeSaam Tv
Published On

थोड्याशा विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा पडायला सुरुवात केली आहे. पावसाळ्याच्या महिन्यात चमचमीत पदार्थाचं नाव काढलं की तोंडात पाणी येते. लागोपाठ सुट्ट्या आल्याने काहीजणं सुट्टीचा आनंद घरी बसून घेत आहेत .या पावसाळ्याच्या महिन्यात कोणाला चमचमीत पदार्थ खायला आवडणार नाही. बटाटे भजी, कांदे भजी, वडा पाव असे अनेक पदार्थ बाजारात मिळत असतात. पण रोज-रोज बाहेरचे पदार्थ खाल्याने आपल्या आरोग्याची हानी होते. त्यामुळे आपल्या आरोग्यावर ही परिणाम होऊ लागतो.

भारतात वडा पाव हा प्रचंड लेकप्रिय आहे. वडा पावचे नाव काढताच क्षणी सगळ्यांच्या तोंडामध्ये पाणी येते. म्हणून तुमच्यासाठी भारतातील लोकप्रिय वडा पावची रेसिपी आणली आहे. ज्यामुळे तुम्ही हा स्वादिष्ट वडा पाव घरच्या घरी बनवू शकता. वडा पावचा हा आनंद घरच्याघरी लुटण्यासाठी ही रेसिपी तुमच्यासाठी आहे.

Vada Pav Recipe
Sabudana Vada Recipe : गौरी पुजनाला उपवासासाठी बनवा १० मिनिटांत साबुदाणा वडा; वाचा सिंपल रेसिपी

साहित्य

बटाटे, बेसन पीठ, चिरलेला कांदा, तेल, कोथिंबीर, लिंबाचा रस, हळद, जीरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, आले लसून आणि मिरचीची पेस्ट

वडा पाव बनवण्याची पद्धत

प्रथम गॅस ऑन करुन त्यावर कुकर ठेवा. त्या ठेवलेल्या कुकरमध्ये पाणी टाकून बटाटे उकळायला ठेवा. कुकरच्या तीन शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर कुकरमधील बटाटे बाहेर काढून थंड करण्यासाठी बाजूला ठेवा. त्यानंतर उकळलेल्या बटाट्याची साले काढून त्यांना चांगले मॅश करा. त्यानंतर पॅन गॅसवर ठेवून त्यात तेल टाका. गॅसला मंद आचेवर ठेवून त्या तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, टाका. हे फोडणीचे साहित्य चांगले मिक्स झाल्यावर त्यात आले लसूण आणि मिरचीची पेस्ट त्यावरुन टाका. हे मिश्रण चांगले परतून घेतल्यानंतर त्यात हिंग, हळद, मीठ,घाला. परत एकदा हे सर्व पॅनमधील मिश्रण नीट परतून घ्या.त्यानंतर त्यात मॅश केलेले बटाटे आणि चिरलेली कोथिंबीर आणि लिबांचा रस टाका. पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकत्रितपणे नीट एकत्र करुन घ्या. त्यानंतर गॅस बंद करुन हे मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्या. त्यानंतर बटाटाच्या भाजीचे लहान गोळे तयार करुन घ्या.

Vada Pav Recipe
Shengdana Poli Recipe : तोंडात टाकताच विरघळेल अशी चविष्ट शेंगदाणा पोळी; मुलांच्या टिफिनसाठी वाचा रेसिपी

बेसन पीठात तळा

बेसनाचे पीठ तयार करताना एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्या. त्यानंतर त्या पीठात हिंग, हळद, मीठ टाका. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून सर्व एकजीव करुन घ्या. त्यानंतर एक कढई गॅसवर ठेवा. त्यानंतर त्यात तेल टाकून थोडेसे गरम होऊ द्या.त्यानंतर बटाट्याचे ते लहान गोळे पुन्हा एकदा व्यवस्थित तयार करुन घ्या. त्यानंतर त्या लहान गोळ्यानां बेसनाच्या पिठात दोन्ही बाजूनीं डिप करा. डिप केलेल्या त्या गोळ्यानां गरम तेलात टाका. त्यानंतर २ मिनिटे त्याला मंद आचेवर तळत करत राहा. डिप केलेल्या गोळ्याचा रंग सोनेरी होईपर्यंत तळा. त्यानंतर त्याला बाहेर काढून टिशू पेपरवर ठेवा. अशा प्रकारे आपला वडा तयार झाला आहे. या बटाट्याच्या वड्याला तुम्ही पावात टाकून मिरची सोबत सर्व्ह करु शकता.

Vada Pav Recipe
Maswadi Recipe : जुन्नर स्टाईल झणझणीत मासवडी घरच्याघरी कशी बनवायची; वाचा रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com