Sabudana Vada Recipe : गौरी पुजनाला उपवासासाठी बनवा १० मिनिटांत साबुदाणा वडा; वाचा सिंपल रेसिपी

How to Make Sabudana Vada For Fast : उपवासाला सर्वांना साबुदाणा खिचडी खाउन कंटाळा येतो. त्यामुळे आज आम्ही साबुदाणा वडे कसे बनवायचे याची सिंपल आणि सोपी रेसिपी सांगणार आहोत.
How to Make Sabudana Vada For Fast
Sabudana Vada RecipeSaam TV
Published On

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धमाल सुरू आहे. अशात उद्या म्हणजे १० सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पुजन आहे. गौरी पुजन असल्याने अनेक महिला या दिवशी उपवास करतात. गौराईच्या स्वागतासाठी तुम्ही व्रत किंवा उपवास करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी उपवासाचे खास साबुदाणा वडे सिंपल आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे याची रेसिपी आणली आहे.

साहित्य

साबुदाणे

शेंगदाणे

भगर

मिरची

मिठ

जीरे

कोथिंबीर

How to Make Sabudana Vada For Fast
Modak Perfect Recipe : मोदकाला आकार आणि कळ्या पाडता येत नाहीत? 'या' पद्धतीने कणीक मळा

कृती

साबुदाणा वडा बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाणे पाण्यात भिजत ठेवा. किमान आदल्या रात्री तुम्ही साबुदाणे भिजत ठेवले पाहिजेत. साबुदाणे भिजत ठेवण्याते तुम्ही विसरला असाल तर सकाळी उठल्यावर गरम पाण्यात साबुदाणे भिजवू शकता. त्यामुळे साबुदाणे लवकर मऊ होतात.

पुढे एक बटाटा घ्या. बटाट्याच्या सर्व साली काढून घ्या. साल काढल्यानंतर बटाटा पाण्यात शिजवून घ्या. बटाटा छान शिजला की तो स्मॅशरच्या सहाय्याने बारीक करून घ्या. त्यानंतर यामध्ये जीरे, मिरची, भगर आणि शेंगदाण्यांचा कुट, कोथिंबीर आणि चविनुसार मीठ मिक्स करून घ्या.

त्यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण एकत्र मिक्स करताना यामध्ये जास्त पाणी किंवा तेल मिक्स करू नका. पाण्याचा एक साधा हपका घ्या. थोडं थोडं पाणी घेऊन साबुदाणे व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर थोडे थोडे मिश्रण घेऊन याचे छान वडे तळून घ्या.

साबुदाणा वडा तळल्यावर चिकट होतो. त्यामुळे वडा तळत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवा. कारण तुम्ही गॅस जास्त फास्ट केल्यास त्याने साबुदाणा वडा वरून करपेल. तर गॅस कमी असल्यास साबुदाणा वडा आतमध्ये कच्चा राहण्याची शक्यता असते. त्यामुळे याची काळजी घ्या.

मिडिअम टू लो गॅस फ्लेमवर वडा तळल्याने तो कुरकुरीत आणि मऊ सुद्धा होतो. उपवासाला काही तरी चमचमीत खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने साबुदाणा वडा बनवू शकता.

How to Make Sabudana Vada For Fast
Tadka Recipe : डाळीला द्या ‘या’ अनोख्या पद्धतीची फोडणी, खमंग वासानेच पोट भरेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com