Shreya Maskar
विविध राज्यात त्याच्या विशेष खाद्यसंस्कृतीनुसार जेवणाला फोडणी दिली जाते.
फोडणी दिल्यामुळे पदार्थाची चव द्विगुणी होते.
आपण फोडणी देताना सर्व सामान्यपणे तेल गरम करतो. पण या पद्धतीमध्ये आपण दगड गरम करणार आहोत. अशी फोडणी आदिवासी भागात दिली जाते.
गुळगुळीत दगड आग किंवा गॅसवर ठेवून लाल होईपर्यंत गरम करा.
गरम दगड स्टीलच्या भांड्यावर ठेवा.
आता फोडणी देण्यासाठी दगडावर तेल ओता.
त्यानंतर या मिश्रणात हिंग, लसूण, मिरची आणि मोहरी घालून गरम दगडावर भाजून घ्या.
जेव्हा हे सर्व पदार्थ छान तडतडू लागतील. तेव्हा दगड बाहेर काढून फोडणी भाजी किंवा डाळीला द्या.
हा आगळावेगळा स्टोन तडका घरी नक्की करून पाहा.