Shreya Maskar
पावसाळ्यात संध्याकाळी काही चटपटीत खावेसे वाटत असल्यास, घरीच झटपट शेव पुरी बनवा.
शेव पुरी बनवण्यासाठी मैदा, रवा, बटाटे, कांदा, टोमॅटो, शेव, लाल चटणी, चिंचेची गोड चटणी, हिरवी चटणी, चाट मसाला, जिरे पूड, ओवा, लिंबाचा रस, तेल , मीठ इत्यादी साहित्य लागते.
शेव पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे कुकरला उकडून घ्या आणि थंड झाल्यावर मॅश करा.
दुसरीकडे पुरी बनवण्यासाठी बाऊलमध्ये मैदा, रवा, मीठ, ओवा, तेल आणि थोडे पाणी घालून चांगले कणीक मळून घ्या.
आता या कणीकेचे छोटे गोळे करून चपातीचा आकार द्या.
तयार झालेल्या चपातीवर वाटीच्या साहाय्याने छोट्या पुऱ्या कापून घ्या.
पुऱ्या कडक होण्यासाठी त्यावर फोर्कच्या सहाय्याने छिद्र करून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पुरी गोल्डन फ्राय करून घ्या.
शेवपुरी बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये पुरी सजवून ठेवा. त्यावर मॅश केलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो लाल हिरवी आणि चिंचेची चटणी घाला.
या मिश्रणावर चाट मसाला, जिरे पूड आणि मीठ शिंपडा. वरून शेव घालून हिरवी चटणी टाका
शेवटी लिंबाचा रस पिळा. तुमची चटपटीत शेवपुरी तयार झाली.