Pressure Cooker Using Tips : सावधान! कुकर लावताना तुम्ही 'या' चुका करता का? घरात होऊ शकतो ब्लास्ट

How To Avoid Pressure Cooker Blast : प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवताना खूप काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्या एका चुकीमुळे कुकरचा ब्लास्ट होऊ शकतो.
How To Avoid Pressure Cooker Blast
Pressure Cooker Using Tips Saam TV
Published On

सर्व व्यक्ती आपल्या रोजच्या जीवनात व्यस्त असतात. त्याचबरोबर सगळ्यांना जेवण ही महत्त्वाचे आहे. त्यामुळे महिला असोवा पुरुष प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवण्याचा विचार करतात. सध्या प्रेशर कुकरचा वापर प्रत्येक घरांमध्ये केला जात आहे. या प्रेशर कुकरचं मुख्य कारण म्हणजे त्यात लवकर जेवण शिजतं , आणि जेवण बनवताना जास्त वेळ लागत नाही. परतुं याच प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवताना खूप काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्या एका चुकीमुळे कुकरचा ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळे प्रेशर कुकर वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.

How To Avoid Pressure Cooker Blast
Pressure Cooker : प्रेशर कुकरचे हट्टी डाग कितीही घासलं तरी जात नाहीत; 'या' २ मिनिटांत होईल चकाचक

कुकर नीट स्वच्छ करा

रोजच्या वापरात आलेला कुकर स्वच्छ करणं हे खूप अवघड काम आहे. जिथून कुकरची वाफ निघत असेल त्या जागी जर अन्न राहीलं तर वाफ बाहेर न आल्यामुळे ब्लास्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुकरची स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

क्षमतेपेक्षा जास्त जेवण

काही व्यक्ती आपल्या सोयीनुसार कुकर घेतात. त्यामुळे कुकरची कॅपेसिटी लीटरमध्ये मापलेली असते. जर कुकरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अन्न ठेवलं तर कुकरचा ब्लास्ट होण्याची शक्यता असते. म्हणून कुकरमध्ये क्षमतेपेक्षा कमी अन्न ठेवावे.

झाकण उघडण्याची घाई नको

अनेकदा आपण घाई गडबडीमध्ये असतो. कुकर गॅसवरुन खाली उतरवताना लगेच खोलण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र हे चुकीचे आहे. यामुळे आपला हातही भाजू शकतो. म्हणून नेहमी गॅस बंद केल्यावर ५ ते १० मिनिटांनी त्यांतील वाफ कमी झाल्यावर कुकर उघडावा.

कुकरमध्ये पाण्याचे प्रमाण

नेहमी प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवताना पाणी योग्य प्रमाणात टाकावं. कारण जास्त पाणी झालं तर ते कुकरच्या शिट्टीमधून बाहेर पडतं. जर कुकरमधील पाण्याचं प्रमाण कमी झालं तर अन्न कच्चं राहण्याची शक्यता असते आणि कुकरही करपण्याची शक्यता असते.

'या' गोष्टींमुळे ब्लास्ट होऊ शकतो

प्रेशर कुकरचा ब्लास्ट होण्याचं कारण म्हणजे रिंग, शिटी तुटणे, सेफ्टी वॅाल्वमध्ये गडबड, यांसारख्या गोष्टी खराब झाल्यामुळे अपघात होऊ शकतो. तसेच रेग्युलेटर नीट चालत नसल्यास लगेच बदलणे आवश्यक आहे.

झाकणाची तपासणी

प्रेशर कुकरच्या झाकणामध्ये लॅकिंग मेकॅनिझम असते. त्यामुळे झाकण नीट बसवताना प्रोब्लेम होतो. याचं कारण म्हणजे जर प्रेशर कुकरमध्ये योग्यप्रकारे प्रेशर तयार झालं नाही तर ब्लास्ट होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आपण झाकण योग्यरितीने तपासले पाहीजे.

कुकरची तपासणी

नेहमी कुकर घेताना तो पूर्णपणे चेक करुन घ्याावा. कुकर हा नेहमी मजबूत असावा. त्यात कोणत्याही प्रकारचे तडे , कमकुवतपणा नसावा. त्यामुळे कुकरची व्यवस्थित तपासणी करुन मगचं खरेदी करावा.

How To Avoid Pressure Cooker Blast
Pressure Cooker Coffee: फिल्टर कॉफीनंतर आता चक्क प्रेशर कुकरमध्ये बनवली कॉफी;VIDEO VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com