Dal Cooking Method
Health TipSAAM TV

Health Tips : डाळ कुकरमध्ये उकडूनही राहते कच्ची? मग ही कुकिंग प्रोसेस ट्राय करा

Dal Cooking Method : भारतीय आहारात डाळ हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र डाळ शिजवताना अनेक वेळा ती कच्ची राहते. यामुळे डाळीची चव बिघडते. तुमच्या डाळ शिजवण्याच्या कुकिंग प्रोसेसमध्ये हे छोटे बदल केल्यास डाळ झटपट शिजेल आणि कच्ची राहणार नाही.
Published on

डाळ हा पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यामुळे याचे योग्य पद्धतीने सेवन करणे गरजेचे आहे. जेणेकरून सर्व पोषक घटक आरोग्याला मिळतील. अनेक महिलांची अशी तक्रार असते की, डाळ कितीही शिजवली तरी कच्ची राहते. चला तर मग डाळ शिजवण्याची सर्वोत्तम पद्धत जाणून घेऊयात.

डाळ शिजवताना पाण्याचे प्रमाण?

डाळींमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. जे पाण्यात लवकर विरघळते. जर तुम्ही डाळीमध्ये जास्त पाणी घातल्यास व्हिटॅमिन सी निघून जाते. कधीही डाळ शिजवल्यानंतर त्यामधील पाणी काढून टाकून मगच डाळीला तडका द्यावा. डाळ उकडताना मयार्दीत प्रमाणात पाणी टाकणे महत्त्वाचे आहे. कधीही डाळीमध्ये एक ते दीड इंच भिजेल ऐवढेच पाणी घालावे.जास्त वेळ डाळ उकडल्याने डाळ फुटते आणि मऊ होते.

डाळ शिजवल्यावर उरलेले पाणी

डाळ शिजवल्यानंतर पाणी उरते. हे पाणी फेकून न देता याचा आहारात वापर करावा. कारण डाळीपेक्षा डाळीच्या पाण्यामध्ये पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे डाळीचे पाणी सूपमध्ये घालून प्यावे. यामुळे सूपमधील पोषक तत्व वाढतात.

Dal Cooking Method
Palak Paneer Cutlet : मुसळधार पावसात हलकी-फुलकी भूक लागली? मग झटपट बनवा पालक- पनीर कटलेट

डाळ शिजवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • डाळ जास्त प्रमाणात शिजवल्यास त्यातील पोषक घटक कमी होतात.

  • डाळी मधील प्रथिनांचे प्रमाण टिकून ठेवण्यासाठी नेहमी डाळ कुकरमध्ये उकडावी.

  • बाजारात विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध आहे. त्यामुळे वगवेगळ्या डाळीप्रमाणे शिजण्याची वेळ बदलत राहते.

  • मसूर आणि चणा डाळ लवकर शिजते.

  • डाळ मंद आचेवर उकडून घ्याव्या.

  • डाळ उकडून झाल्यावर १५ ते २० मिनिटे गरम पाण्यात ठेवा. त्यामुळे कधी डाळ कच्ची राहिल्यास पूर्ण शिजेल.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Dal Cooking Method
Tea Lover Country : ना भारत, ना चीन! या देशात आहेत सर्वाधिक चहा प्रेमी; तुम्हाला माहितीये का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com