Shreya Maskar
पावसाळ्यात सायंकाळच्या नाश्त्याला चटपटीत खायची इच्छा झाल्यास झटपट डाळ वडा बनवा.
डाळवडा बनवण्यासाठी चना डाळ, कांदा , कढीपत्ता, आलं , हळद, लाल तिखट, हिंग, कोथिंबीर, तेल, मीठ इत्यादी साहित्य लागते.
डाळ वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुवा आणि पाण्यात भिजत ठेवा.
आता भिजवलेली चणा डाळीतून पाणी काढून मिक्सरला वाटून घ्या.
एका भांड्यात चणा डाळीची पेस्ट, हळद, लाल तिखट आणि हिंग घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.
आता या मिश्रणात चिरलेला कांदा, आल्याची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण छान एकजीव करा.
हाताला तेल लावून डाळ वडा थापून घ्या.
पॅनमध्ये गरम तेल करून डाळ वडे गोल्ड फ्राय होईपर्यंत छान तळून घ्या.
अशाप्रकारे १५ मिनिटांत डाळ वडा तयार झाला. पुदिन्याच्या चटणीसोबत स्वादिष्ट डाळ वड्याचा आस्वाद घ्या.