Shreya Maskar
दह्याचा वापर न करता फक्त १० मिनिटांत सकाळच्या नाश्त्याला झटपट खमण ढोकळा बनवा.
खमण ढोकळा बनवण्यासाठी हिरवी मिरची, तेल, साखर, हळद, मीठ, आलं, बेसन, मोहरी, कढीपत्ता, हिंग, तीळ इत्यादी साहित्य लागते.
खमण ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरला साखर, हळद, पाणी, तेल , हिरवी मिरची, आलं टाकून छान वाटून घ्या.
एका भांड्यात बेसन, पाणी आणि चवीनुसार मीठ घालून घट्टसर बॅटर बनवून घ्या आणि झाकून ठेवा.
या मिश्रणात बेकिंग सोडा टाकायला विसरू नका.
आता एका छोट्या भांड्यात बटर पेपर घालून तेल लावून घ्या आणि त्यात ढोकळ्याचे बॅटर टाका.
बटर पेपरमुळे ढोकळा भांड्याला चिकटणार नाही. हे भांडे कुकरमध्ये पाणी घालून मंद आचेवर शिजायला ठेवा.
आता एका छोट्या पॅनमध्ये तेल, मोहरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, साखर आणि तीळ घालून फोडणी द्या.
कुकरमधून ढोकळा बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवा आणि त्यावर ही फोडणी घाला. शेवटी वरून हिरवीगार कोथिंबीर भुरभुरून खमण ढोकळ्याचा आस्वाद घ्या.