Siddhi Hande
कॉर्न खायला सर्व लहान मुलांना आवडते. परंतु कॉर्न चाट हे अजूनच चविष्ट लागते.
क्रिमी कॉर्न चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये बटर गरम करा.
या बटरमध्ये शिमला मिरची ५ मिनिटे परतून घ्या. त्यात उकडलेले कॉर्न घालून परतून घ्या.
त्यानंतर एका भांड्यात लाल तिखट, चिली फ्लेक्स, चाट मसाला आणि मीठ टाका.
या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाका.
हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करु घ्या. तुम्ही हे चटपटीत कॉर्न चाट नाश्त्याला खाऊ शकतात.