Palak Paneer Cutlet : मुसळधार पावसात हलकी-फुलकी भूक लागली? मग झटपट बनवा पालक- पनीर कटलेट

Palak Paneer Cutlet Recipe : जास्त तेलकट पदार्थ नको असतात अशा व्यक्ती क्रिस्पी शॅलो फ्राय केलेलं कटलेट खाऊ शकतात. त्याची रेसिपी काय आहे? साहित्य किती लागणार? या सर्वांचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
Palak Paneer Cutlet Recipe
Palak Paneer Cutlet Saam TV
Published On

सायंकाळच्यावेळी पावसाचं मस्त वातावरण झालं की आपल्याला लगेच काही तरी चमचमीत आणि टेस्टी खावं वाटतं. पोटाची आणि जीभेची भूक मिटवण्यासाठी काही व्यक्ती डिप फ्राय तळलेले कांदा किंवा विविध प्रकारचे भजी बनवतात. मात्र डायेट करत असलेल्यांना असे जास्त तेलात तळलेले भजी खावेसे वाटत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी कमी तेलात आणि कुरकुरीत होणाऱ्या कटलेटची रेसिपी आणली आहे.

Palak Paneer Cutlet Recipe
Janmashtami Prasad Recipe: जन्माष्टमीनिमित्त घरच्याघरी बनवा गोपाळकाला; वाचा सिंपल रेसिपी

कटलेट खाणं प्रत्येकाला आवडतं. वरतून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेलं कटलेट आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे. ज्या व्यक्ती डायेट करत आहेत किंवा ज्यांना जास्त तेलकट पदार्थ नको असतात अशा व्यक्ती क्रिस्पी शॅलो फ्राय केलेलं कटलेट खाऊ शकतात. त्याची रेसिपी काय आहे? साहित्य किती लागणार? या सर्वांचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

साहित्य

आमचूर पावडर - १ चमचा

मीठ - चवीनुसार

ब्रेड क्रम्स- १ कप

तेल - शॅलो फ्रायसाठी

पालक - २ कप बारीक चिरलेली

पनीर - २०० ग्राम बारीक किसलेलं

बटाटे - २ उकडवून स्मॅश केलेले

कांदा- बारीक चिरलेला

कोथिंबीर - १ चमचा

जीरे पावडर - १ चमचा

कृती

सर्वात आधी एक भांड घ्या. यामध्ये बारीक चिरलेली पालक, पनीर, बटाटे आणि कांदा एकत्र मिक्स करून घ्या. मिश्रण एकजीव होत असताना यामध्ये कोथिंबीर, जीरे पूड, मीठ आणि आमचूर पावडर सुद्धा मिक्स करा. सर्व मिश्रण एकजीव केल्यावर त्याचे तुम्हाला हवे तसे गोळे तयार करून घ्या.

त्यानंतर एक नॉनस्टीक पॅन घ्या आणि तापण्यासाठी ठेवा. दुसरीकडे ब्रेड क्रम्स तयार करून घ्या. आता तुम्ही बनवलेले कटलेट एक एक करून ब्रेड क्रम्समध्ये ठेवून तव्यावर शॅलो फ्राय करून घ्या. आपल्याला कटलेट शॅलो फ्राय करताना कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे.

कटलेट छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर एका प्लेटमध्ये टिशूपेपर ठेवून त्यावर तळलेले कटलेट ठेवा. असे करून सर्वच कटलेट एक एक करून शॅलो फ्राय करून घ्या. या पद्धतीने बनवलेले कटलेट चवीला फार छान लागतात. लहान मुलांना देखील टिफीनमध्ये तुम्ही असे कटलेट बनवून देऊ शकता.

Palak Paneer Cutlet Recipe
Maswadi Recipe: श्रावणात बनवा गावरान स्टाईल झणझणीत मासवडी, सोपी रेसिपी वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com