Manasvi Choudhary
श्रावण महिन्यात गावरान स्टाईल मासवडी खायला सर्वांनाच आवडते.
घरगुती स्टाईल मासवडी कशी बनवायची जाणून घ्या
मासवडी बनवण्यासाठी बेसन, खोबरे, तीळ, शेंगदाणे, कांदा, लसूण, मिरची-कोथिंबीर, हळद, मीठ, मसाला, जिरे साहित्य घ्या.
Shravan Special
मिक्सरला भाजलेले तीळ, शेंगदाणे आणि लसूणची पेस्ट करून त्यामध्ये चवीनुसार मीठ, मसाला आणि कोथिंबीर घालून बारीक मिश्रण करा.
एका भांड्यात लसूण, हिरवी, मिरची, मीठ, जिरे, हळद मिक्सरला बारीक वाटून त्यामध्ये किसलेले खोबरे घालून सारण तयार करा.
यानंतर एका कढईत गरम तेलात जिरे, हिंग, हळद, लसूण पेस्ट घालून परतून घ्या. त्यात १ कप पाणी आणि चवीनुसार लाल तिखट घाला.
नंतर मंद आचेवर मिश्रणात बेसन घालून घोटा. मिश्रण जास्ती पातळ होऊ देऊ नका.
एक स्वच्छ रूमाल ओला करून घ्या. त्यावर तयार पिठाचे मिश्रण गोल आकारात पसरवून घ्या. मिश्रणावर सारण घाला.
नंतर रोल करून त्याच्या गोल आकाराच्या वड्या कापून घ्या. तयार मासवडीचे तुम्ही तळून तसेच रस्सा असे विविध प्रकार देखील बनवू शकता.