Tea Lover Country : ना भारत, ना चीन! या देशात आहेत सर्वाधिक चहा प्रेमी; तुम्हाला माहितीये का?

Turkey Tea Lover Country : आजपर्यंत आपण भारतात सर्वात जास्त चहा प्यायला जातो असे समजत होतो. मात्र भारतापेक्षाही जास्त चहाचे चाहते एका देशात आहेत. जो देश चहा उत्पादनात अग्रेसर आहे.
Turkey Tea Lover Country
Tea Lover CountrySaam TV
Published On

संपूर्ण जगात असलेली चहाची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही, पण तुम्हाला माहित आहे का की जगात सर्वात जास्त चहा कुठे प्यायला जातो? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे ठिकाण ना भारतात आहे ना चीनमध्ये. आजपर्यंत आपण भारतात सर्वात जास्त चहा प्यायला जातो असे समजत होतो. मात्र भारतापेक्षाही जास्त चहाचे चाहते एका देशात आहेत. जो देश चहा उत्पादनात अग्रेसर आहे. हे ठिकाण तुर्की. चला जाणून घेऊया याबद्दल.

तुर्कस्तानमध्ये चहाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येणार नाही. तुर्कस्तानमधील लोकांना असलेले चहाचे वेड आपल्या कल्पनेपलिकडे आहे. तुर्कस्तानमध्ये दरवर्षी प्रति व्यक्ती 7 किलो चहा घेतला जातो यावरून याठिकाणच्या चहा व्यवसायाचा देखिल अंदाज येतो. तुर्कीमध्ये चहा हे एक सांस्कृतिक पेय मानले जाते, जे लोकांना एकत्र आणते आणि यामुळे लोकांमध्ये एकोपा वाढतो.

तुर्किमध्ये चहाच्या लोकप्रियतेमागे अनेक कारणे आहेत. एक कारण म्हणजे तुर्कीमध्ये चहाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. शिवाय, तुर्कस्तानमध्ये चहाच्या किमतीही खूपच कमी आहेत, म्हणुन चहा सर्वसामान्यांच्या आवाक्यात बसतो आणि यामुळे खासकरून कोणत्याही समारंभात, लग्नात, वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये देखिल चहाला पसंती पहायला मिळते. तुर्कीमध्ये चहाच्या लोकप्रियतेचे आणखी एक कारण म्हणजे येथील लोक चहाला सामाजिक पेय देखिल मानतात. येथे लोक सहसा मित्र आणि कुटुंबासह चहा पितात, जे त्यांना एकमेकांच्या जवळ आणण्यास मदत करतात.

आसामचे योगदान

आसाम हे भारतातील असे राज्य आहे ज्याचे चहाशी अतुट नाते आहे. आसाममध्ये चहाची लागवड 19व्या शतकात सुरू झाली होती. जेव्हा ब्रिटिश सरकारने येथे चहाच्या लागवडीला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली होती. आज आसाम जगातील सर्वोत्तम चहाचे उत्पादन करतो, जो त्याच्या मजबूत, उत्तम आणि वेगळ्या चवीसोबत सुगंधासाठी ओळखला जातो.

आसाममध्ये चहाच्या लागवडीसाठी अनुकूल हवामान आणि माती आहे, ज्यामुळे याठिकाणी चहाची गुणवत्ता वाढते. आसाममध्ये चहाच्या लागवडीत शेतकऱ्यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. आसाममधील शेतकरी आपल्या मेहनतीने चहाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com