ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चहा बनवताना चांगल्या गुणवत्तेची चहा पावडर वापरली पाहिजे.
काही लोकांना असं वाटत चहा जास्त उकळला तर त्याची चव छान लागते पण त्यामुळे चहाची चव कडू होत असते.
चहामध्ये कच्च्या दुधाचा वापर करु नये त्यामुळे चहाची चव बिघडते.
जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास अॅसिडिटीचा त्रासदेखील होतो आणि मळमळ होऊ शकते.
चहामध्ये दुध घातल्यानंतर त्याला उकळी आल्यावर त्यात योग्य प्रमाणात साखर घाला त्यामुळे चहा चविष्ट होतो.
जास्त प्रमाणात चहाचे सेवन केल्यास अस्वस्थता आणि थकवा जाणवू शकते त्याचे कारण म्हणजे चहामध्ये आढळणारे कॅफिन.
चहाच्या अतिसेवनेमुळे निद्रानाशासारख्या समस्या होऊ शकतात ज्याचा परिणाम शरीरावर होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.