Pressure Cooker : प्रेशर कुकरचे हट्टी डाग कितीही घासलं तरी जात नाहीत; 'या' २ मिनिटांत होईल चकाचक

How to Clean Pressure Cooker : जेवण बनवताना प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजत असताना त्यावर काही डाग पडतात. जेवणाचे, मसाल्यांचे, तेलाचे डाग तारेच्या काथ्याने सुद्धा काहीवेळा घासावे लागतात.
How to Clean Pressure Cooker
Pressure CookerSaam TV
Published On

प्रत्येक घरात जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये प्रेशर कुकरचा वापर नेहमीच केला जातो. प्रेशर कुकर नसेल तर घरात जेवण बनवणे कठीण होते. यामध्ये डाळ, भात, खिचडी भात, विविध कडधान्ये, नॉनव्हेज देखील अगदी काही मिनिटांत शिजतं. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये प्रेशर कुकर असतो.

How to Clean Pressure Cooker
Kitchen Tips: तांदूळ लवकर शिजवण्यासाठी धूण्याची गरज असते का?

जेवण बनवताना प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजत असताना त्यावर काही डाग पडतात. जेवणाचे, मसाल्यांचे, तेलाचे डाग तारेच्या काथ्याने सुद्धा काहीवेळा घासावे लागतात. हे जिद्दी डाग हटवण्यासाठी कधी कधी अगदी नाकी नऊ येतात. तुम्ही देखील अशा काही समस्येचा सामना करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी प्रेशर कुकर साफ करण्याच्या काही सिंपल ट्रिक्स शोधल्या आहेत. त्याबद्दलच आज जाणून घेऊ.

कांद्याची साल

कुकरवरील डाग मिटवण्यासाठी कांद्याच्या सालींचा उपयोग तुम्ही करू शकता. कांद्याच्या सालींचा काहीच उपयोग होत नाही असा काही व्यक्तींचा समज आहे. मात्र तसे नसून या साली पाण्यात भिजत ठेवा त्यानंतर याने कुकुर घासून घ्या. त्यामुळे हट्टी डाग काढण्यास मदत होते.

बेकिंग सोडा

जर कुकुरमध्ये काही जळाले असेल किंवा कुकर आतमधून काळा झाला असेल तेव्हा त्यातमध्ये पाणी टाका आणि दोन चमचे बेकिंग पावडर मिक्स करा. पुढे हे पाणी गॅसवर ठेवा. थोडी उकळी आल्यानतंर कुकरमधील पाणी खाली उतरवा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर कुकर छान घासून घ्या.

लिंबाचा रस

लिंबूमध्ये असेलेल्या अॅसिडमुळे देखील तांबे, पितळेची भांडी आणि कुकरवरील जिद्दी डाग सुद्धा नाहिसे होतात. त्यासाठी तुम्ही लिंबू मधोमध कापून त्यावर मिठ लवून कुकर स्वच्छ करू शकता. किंवा कुरकरमध्ये लिंबू टाकून त्यात पाणी मिक्स करून त्याला उकळी घ्या. या ट्रिकने सुद्धा कुकरवरील डाग कमी होतात.

How to Clean Pressure Cooker
Kitchen Tips: स्वयंपाक घरातील दुर्गंधी घालवण्यासाठी या टीप्स करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com