ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा किचनमध्ये काही पदार्थ खराब झाल्याने दुर्गंधी पसरते.
किचनमधील दुर्गंधी घालवण्यासाठी खाली दिलेले उपाय एकदा ट्राय करुन पहा.
पुजेसाठी वापरण्यात येणारा कापूर किचनमधील दुर्गंधी घालवण्यासाठी कामी येतो.
किचनमधील असलेल्या कोपऱ्यात एसेन्शिअल ऑइलमध्ये कापूस बुडवून तो ठेवावा,याने किचनमधील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
बेकिंग सोडा पाण्यात मिस्क करुन ते पाणी किचनमध्ये शिंपडावे,यानेही किचनमधील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
किचनमध्ये तुम्ही सुंगधी फुले ठेवू शकता.याने किचनमधील वातावरण सकारात्मक राहण्यासही मदत होते.
संत्र्याची किंवा लिंबूची साले पाण्यात उकळून घ्या,त्यानंतर त्या पाण्यात दालचिनी टाकून ते पाणी किचनमध्ये शिंपडा.