Maswadi Recipe : जुन्नर स्टाईल झणझणीत मासवडी घरच्याघरी कशी बनवायची; वाचा रेसिपी

Junnar Style Maswadi Recipe : जुन्नर स्टाइल मासवडी कशी बनवायची? याची संपूर्ण रेसिपी कृती आणि साहित्यासह जाणून घेणार आहोत.
Junnar Style Maswadi Recipe
Maswadi RecipeSaam TV
Published On

महाराष्ट्रात विविध छोटी मोठी गावं आहेत. या गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी एका वेगळ्या आणि गावरान पदार्थाची खासियत आहे. मासवडी हे नाव तुम्ही आजवर फक्त ऐकलं असेल. काही व्यक्तींनी ही मासवडी हॉटेलमध्ये चाखली असेल. मात्र घरी क्वचितच कुणी बनवली असेल. त्यामुळे आज आपण जुन्नमधील फेमस मासवडी घरच्याघरी कशी बनवायची याची माहिती जाणून घेणार आहोत.

मासवडी बनवणे अगदी सोपं आहे. बेसन पिठापासून मासवडी बनवली जाते. यामध्ये बेसन पिठाचे आवरण करून त्यात एक वेगळा मसाला भरला जातो. तसेच मसाल्याचा झणझणीत रस्सा सुद्धा बनवतात. अशा पद्धतीने मासवडी तयार होते. तर आता या पदार्थाची परफेक्ट रेसिपी जाणून घेणार आहोत.

सारण बनवण्यासाठी साहित्य

तेल - २ पळ्या

सुकं खोबरं - १ वाटी

शेंगदाणे कुट - १ वाटी

खसखस - २ चमचे

धणे - २ चमचे

तीळ - १ चमता

कोथिंबीर - मुठभर

गरम मसाला - १ चमचा

हळद - चिमुटभर

मीठ - चविनुसार

लाल मिरची पावडर - १ चमचा

Junnar Style Maswadi Recipe
Packed Food: पॅक फूडमुळे हार्ट अटॅक, कॅन्सरचा धोका? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

कृती

सर्वात आधी एका भांड्यात तेल घ्या. या तेलात बारीक चिरलेलं सुकं खोबरं भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये शेंगदाणे कुट, खसखस, धणे, तीळ, तोथिंबीर, गरम मसाला, हळद, मीठ, लाल मिरची पावडर एकत्र मिक्स करून घ्या. सर्व मिश्रण तेलात छान भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्या.

बेसनसाठी साहित्य

तेल

हळद - पाव चमचा

मीठ - चवीप्रमाणे

पाणी - २ कप

बेसन पीठ

हिंग

कृती

बेसन बनवताना सर्वात आधी एका भांड्यात तेल घ्या. तेलात पाव चमचा हळद मिक्स करा. त्यामंतर यामध्ये मीठ, हिंग आणि बेसन पीठ मिक्स करून घ्या. हे बेसन पीठ मस्त शिजल्यावर त्याचा गोळा तयार होतो.

पीठ बाहेर काढून थंड होऊ द्या. त्यानंतर एक मोठं कापड घ्या. कापडावर बेसन पीठ बसरवा. त्यानंतर त्यावर कोथिंबीर टाका. तसेच पुढे यावर सर्व मसाला पसरवून घ्या. पुढे रुमालाच्या मदतीने या पीठाचा रोल करून घ्या. त्यानंतर या वडीचे मध्यम आकारात काप करून घ्या.

रस्सा कसा करावा?

रस्सा बनवण्यासाठी सर्वात आधी जीरे, खसखस, धणे, कांदा, सुकं खोबरं, लसूण एकत्र भाजून घ्या आणि मिक्सरला बारीक करून घ्या. पुढे तेलामध्ये हा मसाला मिक्स करा आणि खमंग फोडणी द्या. त्यानंतर या रस्सामध्ये तुम्ही मासवडी घेऊन खाऊ शकता. बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसह ही मासवडी अगदी अप्रतिम लागते.

Junnar Style Maswadi Recipe
Dupatta Styling : दुपट्टा सावरताना नाही उडणार तारांबळ, या पद्धतीने वेअर केल्यास येईल स्टायलिश लूक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com