Rishi Panchami Bhaji : एक थेंबही तेल न वापरता घरीच बनवा ऋषिपंचमीची भाजी; वाचा सिंपल आणि टेस्टी रेसिपी

Rushinchi Bhaji :ऋषिपंचमीची भाजी बनवणे फार सोप्प आहे. फक्त यामध्ये नेमक्या कोणत्या भाज्या वापरल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Rushinchi Bhaji
Rishi Panchami BhajiSaam TV
Published On

राज्यात सर्वत्र गणरायाचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाल्याने प्रत्येक व्यक्ती बाप्पातच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. बाप्पा घरी येण्याच्या आदल्या दिवशी हरितालिका असते. तसेच बाप्पा घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी साजरी केली जाते. ऋषिपंचमीला देखील व्रत असते. हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या आयुष्यात भरभराट येते असं म्हटलं जातं.

ऋषिपंचमी साजरी करताना एक वेगळी भाजी बनवली जाते. हिच भाजी आजच्या ऋषिपंचमीच्या दिवशी खाल्ली जाते. अन्य कोणतीही भाजी खाल्ली जात नाही. आता अनेक महिलांना ही भाजी बनवता येत नाही. तसेच नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या काही मुलींसाठी ही भाजी बनवणे म्हणजे वेगळाच टास्क असतो. त्यामुळे आज ऋषिपंचमीची भाजी नेमकी कशी बनवली जाते याची माहिती जाणून घेणार आहोत.

Rushinchi Bhaji
Shepuchi Bhaji : आहारात खा शेपूची भाजी, हाडे होतील मजबूत

साहित्य

अळूची पाने , लाल माठ, अळूचे देठ, मका, शिराळी, दुधी भोपळा, गाजर, भेंडी, कच्ची केळी, चवळीच्या शेंगा, रताळी, भोपळा, सुरण, हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं, चिंचेचा कोळ, चविनुसार मीठ, शेंगदाणे

कृती

ऋषिपंचमीची भाजी बनवणे फार सोप्प आहे. त्यासाठी या सर्व भाज्या एका कढईमध्ये काढून घ्या. त्यानंतर यामध्ये मीठ आणि चिंचेचा कोळ मिक्स करून झाकन ठेवून एक वाफ येऊ द्या. एक वाफ आल्यावर यातील पालेभाज्यांना पाणी सुटलेलं तु्म्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर हे पाणी आहे त्यातच संपूर्ण भाजी शिजवून घ्या. ही भाजी चवीला इतकी जबरदस्त लागते की एक थेंब तेलाचा वापर न करता देखील घरात सर्वांना आवडते.

भाजी बनवून झाल्यावर तुम्ही ही भाजी नुसती किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता. सोशल मीडियावर @ _marathi_kadhai_ या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Rushinchi Bhaji
Pav Bhaji Without Tomato : टोमॅटो महागले, तरी पावसाळ्यात बनवा चटपटीत पावभाजी! वापरा 'ही' भन्नाट युक्ती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com