Packed Food: पॅक फूडमुळे हार्ट अटॅक, कॅन्सरचा धोका? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Packed Food: पॅक फूड खाणं हा आपल्या सवयीचा भाग बनलाय. कुठच्याही खाऊच्या दुकानात गेल्यानंतर वेफर्सपासून वेगवेगळ्या पाकिटांमधले स्नॅक्स घेतल्याशिवाय आपण तिथून बाहेरच पडत नाहीत. मात्र हे पॅक फूड आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा दावा केला जातोय.
Packed Food:
Packed Food:
Published On

खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या सगळ्याची खातरजमा केली, आमच्या रिसर्चमधून काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. बदलत्या जीवनशैलीमुळे आपलं राहणीमान तर बदललं शिवाय खाण्या-पिण्याच्या सवयी आणि खाद्यपदार्थही बदलले. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकालाच पॅक फूड खाण्याचा मोह आवरत नाही. मग ते वेफर्स, नमकीन, कुरकुरे असोत वा वेगवेगळ्या फ्लेवर्समधले सँडविचेस.

चहासोबत बिस्किटं खाल्ल्याशिवाय अनेकांचा दिवसच सुरू होत नाही. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण दिसेल ते खात सुटतो. मात्र याच पॅक फुडवरून सोशल मीडियात चिंता व्यक्त करणारा मेसेज व्हायरल होतोय. कोणतेही खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यापूर्वी त्यात केमिकल्स मिसळले जातात. त्यात प्लास्टिकचाही अंश असतो असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आलाय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय पाहूयात.

पॅकिंग स्वरूपात विकले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत. वेगवेगळ्या फ्लेव्हर्समधील वेफर्स, नमकीन, बिस्किट्स, बेकरी प्रोडक्ट हार्ट अटॅक किंवा कॅन्सरसारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. हे खाद्यपदार्थ जास्तीत जास्त टिकावेत यासाठी त्यात केमिकल्स तसच प्लास्टिक मिसळलेलं असतं.

खरं तर लहान मुलांमध्ये पॅक फूड खाण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि बेकरी प्रोडक्ट तर सगळेच जण खातात. त्यामुळे खरंच पॅक फूड आरोग्यासाठी घातक आहे का? आम्ही या मेसेजची पडताळणी केली. सर्वात याबाबत तज्ज्ञाचं मत जाणून घेतलं. पॅक फूडबाबत इंटरनेटवरून माहिती मिळू शकते. त्यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या बातम्या तसच तज्ज्ञांचे रिपोर्ट पडताळून पाहिले. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.

ब्रिटिश मेडिकल जर्नलने एक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात पॅक फूडबाबत धोक्याचा इशारा देण्यात आलाय. कोणतेही खाद्यपदार्थ टिकवायचे असतील किंवा त्यांची विक्री पॅकिंग स्वरूपात करायची असेल तर त्यात 5 इंग्रेडिएंट म्हणजेच 5 घटक मिसळले जातात. या 5 घटकांमध्ये केमिकल्स आणि प्लास्टिकचाही समावेश असतो. हे पॅक फूड आरोग्यावर स्लो पॉयझन प्रमाणे काम करतं. भारताच्या बाबतीत बोलायचं झाल्यास FSSAIनं 1300 हून अधिक खाद्यपदार्थ हाय फॅट्स, शुगर अँड सॉल्टेड असल्याचं म्हंटलंय. अल्ट्रा प्रोसेस फूड म्हणजे आजारांना निमंत्रण, त्यामुळे हे पदार्थ वारंवार खाल्ल्यानं डायबिटीज, हार्ट अटॅक, कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

त्यामुळे आमच्या पडताळणीत पॅक फूड खाल्ल्यानं हार्ट अटॅक आणि कॅन्सरचा धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय. खाद्यपदार्थांची एक्स्पायरी डेट वाढवण्यासाठी म्हणजेच ते जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यात केमिकल्सचा वापर होतो. मात्र हेच पदार्थ तुमच्या आयुष्याची एक्स्पायरी कमी करू शकतात. त्यामुळे घरचं ताजं अन्न, हिरव्या भाज्या, फळं आणि नैसर्गिक गुणधर्मांनीयुक्त असेच पदार्थच खा...पॅक फूडच्या आहारी जाऊ नका.

Packed Food:
One Kidney : एका किडनीवर व्यक्ती जिवंत राहू शकतो का? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com