

कर्करोग रुग्णांना त्यांच्या घराजवळ अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने M|O|C Cancer Care & Research Centre ने मुंबईतील चेंबूर येथे नव्या अत्याधुनिक उपचार केंद्राची सुरुवात केली आहे. या नव्या केंद्रामुळे संस्थेची मुंबईतील केंद्रांची संख्या ११ वर तर देशभरातील एकूण केंद्रांची संख्या २८ वर पोहोचली आहे. कर्करोग उपचार सेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी भारतातील वरिष्ठ कर्करोगतज्ञ डॉ. आशा कपाडिया, HOD (Medicine) आणि सेक्शन हेड- मेडिकल ऑन्कोलॉजी, हिंदुजा हॉस्पिटल तसेच डॉ. अविनाश सुपे, संचालक- क्लिनिकल गव्हर्नन्स, हिंदुजा हॉस्पिटल आणि वरिष्ठ GI सर्जन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ जनरल सर्जन आणि कोळेकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अरविंद कोळेकर तसेच माजी खासदार श्री. राहुल शेवाळे हे मान्यवर उपस्थित होते.
या केंद्राचे नेतृत्व अनुभवी कर्करोग तज्ज्ञांची टीम करणार असून त्यामध्ये डॉ. अतुल नारायणकर (मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट), डॉ. उदीप माहेश्वरी (मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट) आणि डॉ. गोपाल सिंघल (हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट तज्ज्ञ) यांचा समावेश आहे.
भारतामध्ये वाढत्या कर्करोग रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर या केंद्राचे उद्घाटन महत्त्वाचे मानले जात आहे. २०२६ मध्ये देशात १५ लाखांहून अधिक नवीन कर्करोग रुग्णांची नोंद होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये अत्याधुनिक आणि वेळेवर उपचारांची मागणी वाढत असताना, लांबचा प्रवास, वाढता खर्च आणि तज्ञ उपचारांची मर्यादित उपलब्धता ही मोठी आव्हाने समोर येत आहेत.
चेंबूरमध्ये मोक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले हे केंद्र रुग्णांना सर्वसमावेशक आणि रुग्णकेंद्रित कर्करोग उपचार सेवा देणार आहे. यामध्ये तज्ञांचा सल्ला, केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीसारखे आधुनिक उपचार उपलब्ध असतील. तसेच कॅन्सर रुग्णांसाठी विशेष पोषण सल्ला, फिजिओथेरपी, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा समतोल ठेवण्यासाठी सहाय्य यांसारख्या सहाय्यक आरोग्य सेवांवरही विशेष भर दिला जाणार आहे.
याशिवाय पॅलिएटिव्ह केअर आणि होम केयर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याबाबत बोलताना एम ओ सी कॅन्सर केयर- चेंबूर येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. अतुल नारायणकर म्हणाले, “कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचार सेवा रुग्णांच्या घराजवळ उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. आमच्या चेंबूर येथील केंद्रामुळे हार्बर मार्गावरील या परिसरातील रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांवरील शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल.”
डॉ. उदीप माहेश्वरी आणि डॉ. गोपाल सिंघल यांनी सांगितले की, “एम ओ सी कॅन्सर केयर ने गेल्या काही वर्षांत अत्याधुनिक कर्करोग उपचार खिशाला परवडणाऱ्या दरात देणारी विश्वासार्ह संस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे वाढते नेटवर्क रुग्णांच्या प्रवासातील अडचणी, वाढता खर्च अशा अनेक समस्यांतून मार्ग काढत रूग्णांना सातत्यपूर्ण उपचार देता येतात हे अधोरेखित केले आहे."
एम ओ सी कॅन्सर केयर यानी चेंबूर केंद्राच्या माध्यमातून संस्थेने भारतातील विश्वासार्ह आणि रुग्णकेंद्रित कर्करोग उपचार नेटवर्क उभारण्याच्या आपल्या ध्येयाला आणखी बळकटी दिली आहे. कोणत्याही रुग्णाला केवळ प्रवास किंवा अन्य अडचणींमुळे उपचारांमध्ये विलंब किंवा तडजोड करावी लागू नये, यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.