Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि अत्यंत हुशार व्यक्तीमत्व होते.
आचार्य चाणक्यांनी चाणक्य नितीमध्ये आयुष्यात यशस्वी होताना कोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे? तसेच एखाद्या व्यक्तीला कसं ओळखलं पाहिजे? याबद्दल सांगितलं आहे.
आचार्य चाणक्य सांगतात की, काही लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नाती जोडतात. जेव्हा फायदा संपतो, तेव्हा ते लांब जातात.
चाणक्यांनी हंसाचे उदाहरण देत सांगितलं की जिथे पाणी असतं तिथेच हंस राहतात. पाणी आटल्यावर ते जागा सोडतात. काही माणसं सुद्धा तशीच असतात.
जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पैसा, यश किंवा ताकद असते, तेव्हा अनेक लोक त्याच्या भोवती असतात. पण कठीण वेळ आल्यावर तेच लोक लांब जातात.
चाणक्य नितीनुसार, माणसाने स्वत:ही कधी स्वार्थी होऊ नये. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास महत्वाचा असतो.
पैसा, यश किंवा पदाचा अहंकार आल्यावर अनेक नाती तुटतात. त्यामुळे नम्र राहणं गरजेचं आहे.