MIDC Recruitment 2023 : सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार! एमआयडीसीत ८०२ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

MIDC Job : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC)नोकरीची संधी निर्माण झाली आहे.
MIDC Recruitment 2023
MIDC Recruitment 2023Saam tv

MIDC Recruitment Vacant Post :

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यासाठी तरुणांनी लवकरच तयारीला लागायला हवे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC)नोकरीची संधी निर्माण झाली आहे.

एमआयडीसीत ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदासाठी नोकरी भरतीची अधिसूचना देण्यात आल्या आहेत. ८०२ पदांसाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली आहे. अर्ज कसा कराल जाणून घेऊया सविस्तर

MIDC Recruitment 2023
Hindustan Petroleum Recruitment 2023: तरुणांनो तयारीला लागा! हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये ३०० जागांसाठी भरती, आजच करा अर्ज

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी (Vacancy) जाहीरात दिली आहे. यासाठी एमआयडीसीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज (Application) करु शकता. हा अर्ज भरण्याची सुरुवात २ सप्टेंबरपासून सुरु झाली असून २५ सप्टेंबर ही शेवटची दिनांक आहे.

एमआयडीसी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांना नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ऑनलाइन लॉग इन करुन आपला अर्ज नोंदवता येईल.

MIDC Recruitment 2023
Bhiwandi One Day Trip: ठाणे जिल्ह्यातील भिंवडीतही आहेत फिरण्याची ठिकाणे; वन डे ट्रिप होईल अविस्मरणीय

1. अर्ज शुल्क (Price)

अर्ज भरण्यासाठी १ हजार रुपयांची शुल्क ऑनलाइन भरावी लागणार आहे.

मागासवर्गीयसाठी अर्ज शुल्क ९०० रुपये असेल.

2. वयोमर्यादा

उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ४० पर्यंत असायला हवे.

आरक्षित वयोगटासाठी कमाल वयात सुट देण्यात आली आहे.

MIDC Recruitment 2023
Marriage Numerology: या दिवशी जन्मलेल्या मुली असतात बेस्ट वाईफ, तुम्ही देखील यात आहात का?

3. रिक्त पदे

या पदासाठी एकूण ८०२ पदे रिक्त आहेत.

4. अर्जाची शेवटची तारीख

२५ सप्टेंबर, २०२३

अधिक माहितीसाठी एमआयडीसीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com