Food Recipes : तुम्हाला 'सुशीला' पदार्थ माहिती आहे? 'सुशीला' तुम्ही कधी खाल्लाय ? जाणून घ्या खमंग रेसिपी

Food Recipes News : पावसाने सध्या राज्यभर दमदार हजेरी लावलेली आहे. या दिवसात कोण फिरायला जात आहे तर कोणी याच पावसात गरमा गरम पदार्थ खाण्यासाठी बाहेर पडत आहेत.
Monsoon Food Recipes
Food Recipes Saam Tv

पावसाळा म्हटलं की, गरमागरम, खमंग खायची इच्छा प्रत्येकाला होते. सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारची छोटीशी भूक, काय खावं, काय बनवावं असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो. तोच तो नेहमीचा नाश्ता खाऊनही कंटाळा येतो. मग घरातल्या व्यक्तीसाठी किंवा लहान मुलांसाठी 'सुशीला' घरी एकदा नक्की ट्राय करा.

Monsoon Food Recipes
Food recipes Viral Video: घरच्याघरी बनवा हॉटेलसरखी काजूकतली; सिंपल रेसिपीचा VIDEO व्हायरल

साहित्य -

500 ग्रॅम मुरमूरे

जिरे

मोहरी

तेल

हळद

हिंग

लिंबू

शेंगदाणे किंवा शेगदाण्याचं कूट

बारिक चिरलेला कांदा

बारिक चिरलेली हिरवी मिरची

कडीपत्ता-कोथिंबीर

चवीनुसार मीठ

कृती -

1) प्रथम कढईमध्ये तेल गरम करून घ्या. त्यामध्ये जिरे, मोहरी, कडीपत्ता, मिरची(chilli), हिंगटाका.

2) त्यानंतर कांदा टाकून छान मऊ लालसर होईपर्यंत परतून घ्या.

3) कांदा परतून होईपर्यंत मुरमुरे पाण्यातून निथळून घ्या.

4)निथळून घेतलेले मुरमुरे आता फोडणीमध्ये घालून मिक्स करून घ्या.

5) आता त्यात तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे (peanuts)किंवा शेंगदाण्याचं कूट टाका

6) चवीनुसार मीठ घालून परत एकदा संपूर्ण मिश्रम मिक्स करून घ्या

7) कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटे शिजू द्यावे

8) २ मिनीटांनी गॅस बंद करून गरमागरम सुशिल्यावर लिंबू पिळून बारीक शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभूरून सर्व करा.

गरमागरम सुशील लहान मुलासह मोठ्यांनाही नक्की आवडेल. सोपी आणि पौष्टिक (Health ) रेसिपी घरात एकदा नक्की ट्राय करा, आणि पावसाळा एन्जॉय करा.

Monsoon Food Recipes
Food recipes Viral Video: घरच्याघरी बनवा हॉटेलसरखी काजूकतली; सिंपल रेसिपीचा VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com