Food recipes Viral Video: घरच्याघरी बनवा हॉटेलसरखी काजूकतली; सिंपल रेसिपीचा VIDEO व्हायरल

Food recipes Viral Video: भारताला समृद्ध असा ऐतिहासिक गोष्टींचा वारसा लाभलेला आहे. भारत म्हंटल की विविध प्रकारचे प्रसिद्ध खाद्यपदार्थं आठवतात.
Food recipes Viral Video:
Food recipes Viral Video: SAAM DIGITAL
Published On

Food recipes Viral Video

भारताला समृद्ध असा ऐतिहासिक गोष्टींचा वारसा लाभलेला आहे. भारत म्हंटल की विविध प्रकारचे प्रसिद्ध खाद्यपदार्थं आठवतात. भारत हा एकमेव देश आहे, जिथं प्रत्येक एक प्रदेश वेगवेगळ्या पदार्थांसाठी ओळखला जातो. मग भारतातील सण-उत्सव कसे मागे राहतील? आपल्या भारतातील सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीमध्ये विविध मिठाई घरी आणण्याचे प्रमाण खूप असते. तसेच आपल्याजवळील व्यक्तींना भेटवस्तू म्हणून मिठाई दिली जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Food recipes Viral Video:
Viral Food Video: कोल्ड आणि हॉटनंतर आता मार्केटमध्ये आलीये कुकर कॉफी; शिट्टीवर होते तयार, पाहा VIDEO

अशातच आता दिवाळीचे वातावरण सगळीकडे आहे. मग दिवाळीमध्ये अनेक मिठाई आपण बाहेरुन आणतो. यामध्ये सर्वांच्या आवडती मिठाई म्हणजे काजूकतली. सणवारांच्या दिवसांत प्रत्येक गोष्टीच्या किंमती या आवाक्याच्या बाहेर असतात. पण आता काही घरच्या घरीगोड बनवण्याचे असेल, तर काजूकतलीशिवाय चांगला पर्याय काय असू शकतो? अशातच सोशल मीडियावर घरच्या घरी सोप्या पद्धतीने काजूकतली बनवण्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.आश्चर्य वाटलं ना ऐकून...हा व्हिडिओ बघाच...

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत, सुरुवातीस थोड्या प्रमाणात काजू घेऊन ते मिक्सरमधून एकदम बारीक करुन घेतले आहे. त्यानंतर एका काचेच्या बाऊलमध्ये वाटलेल्या काजूची पावडर टाकली जाते आणि त्यात एक कप मिल्क पावडर मिक्स केली जाते. मग पॅनमध्ये थोडी साखर टाकून त्यात काही प्रमाणात पाणी टाकून साखरेचा पाक तयार केला जातो.

आधी बारीक केलेल्या काजूच्या वाटणात साखरेचा पाक टाकून ते एकजीव केले जाते. मग तयार झालेल्या पीठाला चपातीसारखा गोलाकार लाटल जातोय. पुढे लाटलेल्या चपातीवर सीलव्हर रंगाचा वर्ख लावला जातो. शेवटी तयार झालेल्या काजूकतलीचे आपल्याला पाहीजे त्या आकाराचे काप करु शकतो.

व्हायरल व्हिडीओ हा @ammakithaali या इन्स्टांग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तसंच शेअरही केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.

Food recipes Viral Video:
Viral Food Video : बटाट्याच्या सालीपासून बनवली अनोखी डिश; नेमका हा पदार्थ काय आहे? बघा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com