हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात ४ नवरात्री साजऱ्या केल्या जातात. त्यातील २ मुख्य तर २ गुप्त असतात. पहिली चैत्र नवरात्री तर दुसरी शारदीय नवरात्री. ही नवरात्र चैत्र, अश्विन, आषाढ आणि माघ महिन्यात साजरी केली जाते.
गुप्त नवरात्री ही माघ आणि आषाढ महिन्यात येते. यंदा माघ नवरात्री (Navratra) ही १० फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. यावेळी नऊ रुपांची पूजा केली जाते. गुप्त नवरात्री शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ते शुक्ल नवमीला समाप्त होणार आहे. १८ फेब्रुवारीला गुप्त नवरात्रीची सांगता करण्यात येईल.
या नवरात्रीमध्ये रवियोग आणि सर्वार्थसिद्धी योग तयार होत असून दुर्गादेवीची विशेष पूजा केली जाते. पूजा करणाऱ्यांना याचे अधिक फळ मिळते. नवरात्रीचा हा सण (Festival) अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो. माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्री असे म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. कलशाची स्थापना करताना दुर्गा देवीचे आवाहन केले जाते.
1. गुप्त नवरात्री घटस्थापना मुहूर्त
गुप्त नवरात्रीचा शुभ मुहूर्त १० फेब्रुवारी रोजी सकाळी ८.४५ ते १०.१० मिनिटांपर्यंत आहे. हा कालावधी १ तास २५ मिनिटे असेल. तर दुसरा शुभ मुहूर्त दुपारी १२. १३ मिनिट ते १२.५८ मिनिटांपर्यंत आहे. हा कालावधी ४४ मिनिटांचा असणार आहे.
2. पूजा पद्धत
गुप्त नवरात्रीमध्ये देवी आदिशक्तीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी पूजेदरम्यान कमळाचे फूल अर्पण करावे. असे केल्याने दुर्गादेवी प्रसन्न होते.
गुप्त नवरात्रीच्या वेळी मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात (Home) ऐश्वर्य येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.