Spiritual of Peepal Tree
Spiritual of LampSaam TV

Spiritual of Lamp : पिंपळाच्या झाडाखाली दिवा का लावतात? वाचा आयुष्यात होणारे फायदे

Spiritual of Peepal Tree : सांजवेळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावतात. हा दिवा का लावला जातो. त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? याची माहिती आज जाणून घेऊ.
Published on

हिंदू धर्मात प्रत्येक झाडाचं, प्रत्येक वृक्षाचं एक वेगळं महत्व आहे. त्यात पिंपळाच्या झाडाला फार महत्व आहे. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रम्हदेव, हरी आणि शंकर देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक व्यक्ती सांजवेळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावतात. हा दिवा का लावला जातो. त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? याची माहिती आज जाणून घेऊ.

Spiritual of Peepal Tree
#shorts Huge Tree Falls on Mumbai Pune Express | मुंबई पुणे हायवेवर कोसळलं झाड, | SAAM TV

कारण काय?

ज्योतिशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावला पाहिजे. शनिवारी हा दिवा लावल्यास ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष आहे त्याची त्यातून मुक्तता होते. शनी देवाला असे प्रसन्न केल्यास त्यातून आपल्या मार्गातील साडेसाती कमी होण्यास मदत होते.

केव्हा दिवा लावावा

पिंपळाच्या झाडाची पुजा करताना नेहमी गुरुवारी आणि शनिवारी झाडाजवळ दिवा लावा. या दोन्ही दिवशी दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. मात्र ज्योतिशास्त्रानुसार रविवारी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नये. तसेच पिंपळाच्या झाडाला दिवाही लावू नये.

फायदे

अनेक व्यक्तींना त्यांच्या जीवनात जुन्या पितरांचा त्रास असतो. त्यावेळी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि विष्णू देवाचं ध्यान करा. तसेच हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. हा उपाय केल्याने पितरांचा त्रास कमी होतो. तसेच दूध आणि काळे तिळ एकत्र मिक्स करून पिंपळाच्या झाडाला अर्पन केले तर पितर प्रसन्न होतात. त्यामुळे पितरांचा त्रास होत असलेल्या व्यक्तींनी हे उपाय नक्की करावेत.

पिंपळाचं झाड एक मोठं वटवृक्ष आहे. त्यामुळे अनेक पशु आणि पक्षांना निवारा मिळतो. त्यामुळे देखील घराजवळ पिंपळाचं झाड असणे शूभ मानलं जातं.

टीप : ही सामान्य माहिती आहे. या विषयी तुम्हाला सविस्तर माहिती हवी असल्यास ज्योतिशांचा सल्ला घ्यावा.

Spiritual of Peepal Tree
Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com