Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Andhra Pradesh Tourism Water Wild Tree Forest : झाडांच्या लाकडांचा वापर आपण ज्वलनासाठी करतो. आता याच झाडाचा आणखी एक अद्भुत शोध लागला आहे. आंध्रप्रदेशमध्ये चक्क पिण्याचं पाणी देणारं झाड सापडलं आहे.
Andhra Pradesh Tourism Water Wild Tree Forest
Water TreeSaam TV

आजवर तुम्ही उन्हापासून रक्षण करणारी झाडं पाहिली असतील. काही झाडं आपल्याला सावली, फुले आणि फळे देखील देतात. नारळपाणी हे एक झाड आपल्याला पाणी देखील देतं. झाडांच्या लाकडांचा वापर आपण ज्वलनासाठी करतो. आता याच झाडाचा आणखी एक अद्भुत शोध लागला आहे. आंध्रप्रदेशमध्ये चक्क पिण्याचं पाणी देणारं झाड सापडलं आहे.

Andhra Pradesh Tourism Water Wild Tree Forest
Travel And Tourism Career: हिंडण्या-फिरण्याची आवड आहे? ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रात करु शकता करिअर; जाणून घ्या

सोशल मीडियावर @kk.create या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये पाणी देणाऱ्या झाडाची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर झाडाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

या झाडामध्ये इतकं पाणी असतं की, ते संपूर्ण गावाची तहान भागवू शकतं. आंध्रप्रदेशच्या एका छोड्या गावात हे दुर्मिळ प्रजातीचं झाड सापडलं आहे. या झाडातून फक्त ऑक्सिजन नाही तर पाणी देखील निघतं. पापीकोंडा नॅश्नल पार्कमध्ये या झाडाचा शोध लागला आहे.

अन्य झाडांमध्ये मुळं जमिनीतून पाणी शोशतात. त्यानंतर खोड हे पाणी सर्व पानांपर्यंत पोहचवते. उरलेल्या पाण्याची वाफ होऊन ते पाणी निघून जाते. मात्र आंध्रप्रदेशमधील या झाडामध्ये पाणी शोशल्यानंतर त्याची वाफ न होत उन्हाळ्याच्या दिवसात हे झाडं एका धिद्रावाटे पाणी बाहेर सोडते. या पाण्याचा नागरिकांना फार फायदा होतो. एवढ्याशा पाण्याने एका संपूर्ण गावाची तहान पूर्ण होऊ शकते.

वॉरेल ट्री असं या झाडाचं नाव आहे. इंडिया टू डे ने देखील याबाबत वृत्त छापलं आहे. आंध्रप्रदेशच्या वन अधिकाऱ्यांनी देखील या झाडाचा शोध घेत यातून पाणी बाहेर काढले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत गरमीपासून सुटका मिळावी यासाठी अशा प्रकारचे झाड प्रत्येक राज्यात आणि शहरात असणे गरजेचे आहे, अशा कमेंट देखील या व्हिडिओवर आल्या आहेत.

Andhra Pradesh Tourism Water Wild Tree Forest
Ratnagiri Tourism: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ठिकाणे आहेत खास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com