Symptoms Of Gallbladder : पित्ताशात स्टोन होणे म्हणजे गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन आढळून येणे ही सामान्य समस्या आहे. यामध्ये लठ्ठपणा, वयोवृद्ध व लहान मुलांचा समावेश अधिक प्रमाणात आढळून येतो. अशीच एक घटना घडलीये पुण्यामध्ये.
पुण्यातील लॅपरोस्कोपिक आणि बॅरिएट्रिक सर्जन, लॅपरो ओबेसो सेंटर डॉ. शशांक शहा यांनी अवघ्या २० मिनिटात ३० वर्षीय महिलेच्या पित्ताशयातील १००० हून अधिक खडे काढण्यात यश मिळाले आहे.
ही व्यक्ती ही पुण्यातील रहिवासी असून तिला गरोदरपणात (Preganancy) ओटीपोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्यामुळे ती घाबरली. तपासणी अंती असे निदर्शनास आले की तिच्या पित्ताशयात खडे तयार झाले आहेत जे तिच्या अवयवांच्या कार्यात व्यत्यय निर्माण करत होते. गर्भधारणा आणि येणाऱ्या प्रसूतीमुळे तिची पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर हा त्रास सतत जाणवू लागल्याने रूग्णांने त्वरीत उपचारासाठी डॉ. शशांक शहा यांच्या लँपरो ओबेसो सेंटरला धाव घेतली.
डॉ शशांक शाह सांगतात की, रुग्णाला पित्ताचे खडे (Stone) असल्यामुळे तिच्या दैनंदिन कामात व्यत्यय येऊन पोटदुखीचा त्रास वाढू लागला होता. सोनोग्राफीने सिस्टिक डक्ट म्हणून ओळखल्या जाणार्या तिच्या पित्त- मूत्राशयाच्या भागात एक अडथळा दिसून आला, सर्वसाधारणपणे या भागात मोठ्या प्रमाणात खडे जमा झाल्यामुळे हा अडथळा निर्माण होतो. रुग्णाला अतिशय वेदना होत होत्या. तिच्या पित्ताशयावर मोठ्या प्रमाणात ताण येऊन अस्वस्थ वाटायचे.
हल्लीच रूग्णाला बाळ झाल्याने रूग्णास बाळाला नियमित स्तनपानान करावे लागत होते त्यामुळे त्यांना ही शस्त्रक्रिया डे केअर पध्दती करण्याकडे कल होता जेणेकरून रूग्ण शस्त्रक्रियेनंतर त्वरीत आपल्या घरी जाऊ शकतील आणि पुढे कोणतीही अडचण येणार नाही. म्हणून मग आम्ही लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी म्हणून ओळखल्या जाणार्या पित्त मूत्राशयायातील खडे काढण्यास या शस्त्रक्रियेची निवड केली.
डॉ शाह पुढे सांगतात की, तपासणीनंतर तिने फक्त तीन पंक्चरसह लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी केली आणि ही प्रक्रिया 20 मिनिटांत पूर्ण झाली. त्यानंतर तिला वेदना झाल्या नाही आणि शस्त्रक्रियेनंतर २० तासांच्या आत घरी सोडण्यात आले आणि ती तिच्या बाळाला स्तनपान देखील करू शकली. यामध्ये लहान १ ते २ मिमी हिरवट पिवळे खडे बहुधा कोलेस्टेरॉलचे दिसून येत होते. रुग्ण बरा झाला आणि कोणत्याही वेदनेशिवाय तिची दैनंदिन कामे करत आहे.
पित्ताचे खडे हे पित्त नावाच्या पाचक रसाचे घट्ट साठे असतात जे पित्त मूत्राशयाच्या पोकळीत तयार होतात. ते लहान, मोठे एक किंवा अनेक असू शकतात. बहुतेकदा पित्त दगडांची लक्षणांमध्ये आंबटपणा, जेवणानंतर पोटात गोळा येणे, विशेषत: मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थांमुळे पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता किंवा गॅस यांचा समावेश आहे. रक्तातील कोलेस्टेरॉल, जास्त चरबीयुक्त आहार, आनुवंशिकता, लठ्ठपणा, मधुमेह (Diabetes), बैठी जीवनशैली, हार्मोनल बदल आणि लठ्ठपणा या कारणांमुळे पित्ताशयात खडे तयार होऊ शकतात. भारतीय लोकसंख्येमध्ये पित्ताचे खडे होण्याचे प्रमाण ५ ते १० टक्के आणि ते २० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
अशा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वेळीच निदान व उपचार करणे महत्त्वाचे आहे. पित्ताचे खडे कोलेस्टेरॉल, पित्त आणि क्षारांनी बनलेले असतात. पित्त, क्षार हे यकृतामध्ये तयार होणारे पाचक घटक आहेत, जेव्हा ते शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत तेव्हा ते कडक होतात आणि दगडांचे रूप धारण करतात.
पित्ताशयाचा खडे तयार होण्यामुळे पित्ताशयाची जुनाट जळजळ दूर होते आणि उपचार न केल्यास आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. पोटाच्या वरच्या भागाची कोणतीही अस्पष्ट लक्षणे सोनोग्राफीद्वारे तपासली पाहिजेत. मधुमेह असलेल्या रुग्णांनी पित्ताच्या खड्यांवर लवकर उपचार केले पाहिजेत कारण पित्ताच्या खड्यांचे संक्रमण आणि गँगरीनसारख्या गुंतागुंतीच्या मधुमेहामुळे सुरुवातीच्या टप्प्यात ते वेदनारहित आणि सौम्य असू शकतात असे डॉ शशांक शहा यांनी स्पष्ट केले.
माझ्या पित्ताशयातून १००० हून अधिक खडे काढण्यात आले हे जाणून मला धक्काच बसला. मी यापूर्वी असे काहीही ऐकले नव्हते. डॉ शशांक शहा आणि त्यांच्या टीमने कोणत्याही वेदनेशिवाय जी शस्त्रक्रिया केली आणि मला माझ्या बाळाला स्तनपान करता आले. तसेच या वेदनादायी दुखण्यातून मला मुक्त केले त्यामुळे मी त्यांची खुप आभारी असल्याची भावना रुग्णाने व्यक्त केली
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.