श्रावण महिना म्हटलं की, अनेकांचा या दिवशी उपवास असतो. या दिवसात अनेक गोडाचे व उपवासाचे पदार्थ चवीने खाले जातात. शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावे पूजा अर्चना करतात.
आज श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार. या दिवशी अनेकांचा उपवास असतो. उपवास असल्यामुळे बरेच लोक फळे व उपवासाचा पदार्थ चवीने खातात. जर तुमचा ही उपवास असेल आणि नैवेद्यात काही झटपट पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी ट्राय करु शकता.
बटाट्याचा हलवा बनवण्यासाठी प्रथम बटाटे स्वच्छ धुवून उकडून घ्या
यानंतर, उकडलेले बटाटे मॅश करा किंवा किसून घ्या.
आता एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्यात देशी तूप (Ghee) टाका.
आता त्यात मॅश केलेले बटाटे घालून चांगले परतून घ्या.
भाजताना सतत ढवळत राहा आणि नंतर साखर घाला. साखर घातल्यावर तळून घ्या.
त्यानंतर यात दूध घाला. हवे असल्यास तुम्ही खवा देखील घालू शकता वरुन वेलची पूड व केशर टाकून नीट ढवळा.
मिश्रण घट्ट होऊ द्या. त्यानंतर यात बदाम, पिस्ता आणि काजू मिक्स करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.